नगरमध्ये सुवर्णा कोतकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

 


माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर  - नगर शहर विधानसभा मतदार संघात माजी महापौर संदीप कोतकर यांच्या पत्नी माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी मंगळवारी (दि.२९) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 


शहरातील जनतेच्या आग्रहाखातर उमेदवारी अर्ज भरला असून सर्वांशी चर्चा करून पुढील रणनीती ठरवू अशी प्रतिक्रिया त्यांनी अर्ज दाखल केल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. माजी महापौर संदीप कोतकर यांनी महापौर असताना केलेली कामे अजूनही नगरकर विसरले नाहीत, त्यामुळे आता जनताच ठरवेल कोणाला निवडून द्यायचे असेही त्या म्हणाल्या. 


माजी महापौर संदीप कोतकर हे शहर विधानसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. मात्र तांत्रिक अडचणीमुळे त्यांना उमेदवारी करता येत नसल्याने त्यांच्या ऐवजी सुवर्णा कोतकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post