लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करण्याचे आवाहन
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर :-लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येकाने येत्या २० नोव्हेंबर रोजी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
तहसील कार्यालय अहिल्यानगर येथील टपाली मतदान सुविधा केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर श्री.सालीमठ यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले, लोकशाही अधिक बळकट व सक्षम करण्यासाठी प्रत्येकाच्या मताला महत्व आहे. लोकशाहीच्या या उत्सवामध्ये येत्या प्रत्येकाने सहभागी होत आपल्या मतदानाचा हक्क बजावावा. मतदान करताना निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र सोबत बाळगावे. ओळखपत्र नसल्यास निवडणूक आयोगाने दिलेल्या १२ पर्यायापैकीचे ओळखपत्र सोबत बाळगून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनही श्री. सालीमठ यांनी यावेळी केले.
Post a Comment