कान्हूरपठार येथे घोंगडी बैठक
माय नगर वेब टीम
कान्हूरपठार : कान्हूरपठार व परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी आपण विधानसभेत आवाज उठवून शास्वत पाणी योजना माग लावण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावू अशी ग्वाही महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांनी दिली.
लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीसाठी राणी लंके या कान्हूरपठारमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना लंके म्हणाल्या, सन २०१९ मध्ये खा. नीलेश लंके यांना मतदारांनी मोठया मताधिक्क्याने विधानसभेत पाठविल्यानंतर त्यांनी त्या पदाला न्याय दिला. मतदारसंघात हजारो कोटी रूपयांची कामे माग लावली. कोणत्याही लोकप्रतिनिधीने मतदार संघात साडेचार वर्षांच्या कालखंडात इतक्या मोठया प्रमाणात विकास कामे माग लावलेली नाहीत. प्रत्येक गावाला विकास कामे देण्याचा प्रयत्न केला गेला. विकास कामे देताना कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता कामे मंजुर करण्यात आली. असे असतानाही विरोधक विकास कामांबाबत चर्चा करतात ती हस्यास्पद आहे. राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनीच लोकसभा निवडणूकीदरम्यान खा. लंके यांनी मतदारसंघासाठी किती निधी खेचून आणला याबाबत सांगितलेले असताना विकास कामांबाबत स्वतः कडे सांगण्यासारखे काही नसताना नागरीकांची दिशाभूल करण्याचे काम विरोधक करत असल्याचे लंके यांनी सांगितले.
यावेळी चंद्रभान ठुबे, किरण ठुबे, बाबासाहेब घुमटकर, प्रसाद नवले, धनंजय ठुबे, शिवाजी व्यवहारे, सरपंच संध्या ठुबे, मा. सरपंच गोकुळ काकडे, मा. उपसरपंच सागर व्यवहारे, विशाल लोंढे, वैभव साळवे, बापू चत्तर, श्रेयश घोडके, तुषार सोनावळे, सुरज नवले, गणेश तांबे, ज्ञानेश्वर गायखे, श्रीकांत ठुबे, राणी घुमटकर, गीतांजली ठुबे, सुशिला ठुबे, देवराम टेकाडे, आनंदीबाई टेकाडे, अनिता घोडके, लता ठुबे,राजाराम ठुबे, भोमा ठुबे, गणेश गायखे आदी उपस्थित होते.
वाजत गाजत मिरवणूक, फुलांचा वर्षाव
लंके यांचे आगमन झाल्यानंतर त्यांची मुख्य बाजारपेठेतून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात येत होता. महिलांकडून त्यांचे औक्षण करण्यात येत होते. महिला तसेच कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून ही प्रचाराची सभा नाही तर विजयाची सभा असल्याचा अभास होत असल्याचे लंके यांनी सांगितले.
भाषणासाठी आपण सक्षम
मला सभेमध्ये बोलता येईल का याबाबत काहींचे गैरसमज होते. मात्र वेळप्रसंगी काय बोलायचे, कोणत्या चेंडूवर चौकार, षटकार मारायचा हे मला चांगले जमते असे सांगत लंके यांनी आपण सभा गाजविण्यासाठी सक्षम असल्याचे सांगितले.
अनुभवाच्या शिदोरीवर आक्रमक प्रश्न मांडणार
सन २०१२ मध्ये पंचायत समितीचे उपसभापतीपद, सन २०१७ मध्ये जिल्हा परिषदेचे सदस्यपद तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपद आपण भुषविलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामाच्या अनुभवामुळे मला जनतेचे प्रश्न ज्ञात आहेत. याच अनुभवाच्या शिदोरीवर पारनेर-नगर मतदारसंघाच्या विविध पश्नांवर विधिमंडळात आपण आक्रमक भुमिका मांडून खा. नीलेश लंके यांच्याप्रमाणेच विकासाची अविरत सुरू ठेवणार आहोत.
राणी लंके :महाविकास आघाडीच्या उमेदवार
कान्हूरकरांची एकी कौतुकास्पद
कान्हूरपठारमधील सर्व गट-तटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मतभेद विसरून एकत्र झाले याचा मनस्वी आनंद आहे. गावकऱ्यांची ही एकी कौतुकास्पद आहे. कान्हूरकरांची ही एकी मतपेटीतून निश्चित पहावयास मिळेल असा विश्वास लंके यांनी व्यक्त केला.
२४ चा योगायोग जुळून आलांय !
गेल्या ७४ वर्षापासून या मतदारसंघाला महिला आमदाराची प्रतिक्षा होती. तो योगायोग असा जुळून आलाय की यंदाचे वर्ष २०२४ आहे. मतदार संघाचा अनुक्रमांक २२४ आहे. राणी लंके यांचा जन्मदिनांक २४ आहे. त्यांनी दि. २४ तारखेलाच अर्ज दाखल केला आहे. तर मतमोजणी २३ रोजी असली तरी दि.२४ नोव्हेंबरच्या वर्तमानपत्रात राणी लंके यांच्या विजयाच्या बातम्या प्रसिध्द होणार आहेत.
जितेश सरडे
प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी आयटी सेल
महिला राज !
या बैठकीच्या व्यासपीठावर महिला होत्या. उपस्थितांमध्येही महिलांचीच संख्या अधिक होती. बैठकीत कधी न बोलणाऱ्या मुली महिला या बैठकीत व्यक्त होत होत्या. आपल्या समस्या मांडत होत्या. तुमची हक्काची आमदार म्हणून मी तुमच्या समस्या दुर करण्यासाठी मी सदैव तुमच्या पुढे असेल अशी ग्वाही राणी लंके यांनी यावेळी दिली.
Post a Comment