युवकांचे भवितव्य आणि शहर विकासाबरोबर उभे राहण्याचा केला संकल्प
शहराचा विकास साधला जात असल्याने युवक-युवतींच्या प्रगतीला चालना मिळाली -रोहित काळोखे
अहिल्यानगर - शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी शहरात कार्यरत असलेल्या युवा एक साथ फाउंडेशनने युवकांचे भवितव्य आणि शहर विकासासाठी नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना पाठिंबा दिला.
फाऊंडेशनच्या युवक-युवतींच्या वतीने पाठिंब्याचे पत्र माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्याकडे देण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित काळोखे, उपाध्यक्ष संदेश कानडे, सचिव साईराज चव्हाण, खजिनदार महेश साठे, कार्याध्यक्ष ओमकार पागावाड, सदस्य सुमित भिंगारदिवे, हर्ष शिरसाठ, महिला अध्यक्षा टेरी वाघमारे, दिनेश वैराळ, वैभव गुडेकर, विशाल ठोकळ, प्रेम काळे, यश शेकटकर, श्रेयस शेरकर, आयुष बोर्डे, सिद्धांत खरात आदी उपस्थित होते.
रोहित काळोखे म्हणाले की, शहराचा विकास साधला जात असल्याने युवक-युवतींच्या प्रगतीला चालना मिळाली आहे. शहराला असलेली खेड्याची प्रतिमा पुसण्याचे काम त्यांनी केले. शहरात शिक्षण घेऊन मोठ्या शहरात नोकरीसाठी जाणाऱ्या युवकांना स्थानिक शहरातच चांगले काम मिळत आहे. शहराचा झपाट्याने विकास साधला जात असताना अनेक मल्टीनॅशनल दालने शहरात दाखल झाली आहेत. तसेच युवकांच्या भवितव्यासाठी कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्राला बळ देण्याचे काम आ. जगताप यांनी केले असल्याने युवक-युवतींचा त्यांना पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
टेरी वाघमारे म्हणाल्या की, महिला व युवतींना शहरात सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. मोठ्या प्रमाणात शहरात पथदिव्यांनी शहर उजळल्याने महिला वर्गाला रात्री न घाबरता घरा बाहेर पडणे शक्य झाले. उपनगराचा विकास साधत असताना तेथील क्रीडांगण व उद्यानांचा विकास साधल्याने युवक-युवती, महिला व ज्येष्ठ नागरिकांची सोय झाली. या विकासाला अधिक गती देण्यासाठी व त्यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी युवकांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संदेश कानडे यांनी युवकांनी राजकारण व भुलथापांना बळी न पडता, विकासाला साथ देऊन आ. जगताप यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन केले.
Post a Comment