नगर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : निष्ठावान शिवसैनिक उपद्याप करत नाहीत. तुम्ही शिवसेनेचे निष्ठावान म्हणता दुसरीकडे भाजपाचे टेंडर भरता मग तुम्ही कसले निष्ठावान शिवसैनिक ? उध्दव ठाकरे यांना अपमानास्पद पध्दतीने वर्षा बंगल्याबाहेर काढले त्याचा बदला घेण्याची वेळ आलेली असताना तुम्ही बंडखोरी करता असे सांगत खा. नीलेश लंके यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार संदेश कार्ले यांचे नाव न घेत हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना खा. लंके पुढे म्हणाले, शिवसेनेची व्याख्या मला सांगू नका. माझ्या हातात आजही शिवबंधन आहे. स्वाभिमानी मतदार बंडखोरी खपवून घेणार नाही. हे ठरावीक गावांत फिरतात. लोक बुक्क्याच्या गाडीत नव्हे तर गुलालाच्या गाडीत बसतात. आमच्या व्यासपीठावर निष्ठावान लोक असल्याचे लंके यांनी सांगितले.
लंके पुढे म्हणाले, ही निवडणूक राज्याच्या हिताची आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येणार ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे. आपला उमेदवार विजयी होणारच आहे. फक्त मताधिक्क्याचा प्रश्न शिल्लक असल्याचे सांगत ही निवडणूक फार पुढे निघून गेल्याचे लंके म्हणाले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रा.शशिकांत गाडे हे होते.यावेळी माधवराव लामखडे, प्रताप शेळके, बाळासाहेब हराळ, संपत म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, घनश्याम म्हस्के, बाळासाहेब कोतकर, संजय जपकर, आबासाहेब कर्डिले, शिवा होळकर, पोपट खामकर, एकनाथ झावरे, साहेबराव बोडखे, अजय लामखडे, विद्या भोर, बाळासाहेब गायकवाड, केतन लामखडे, गंगाधर रोहकले, वसंत पवार, अशोक शिंदे, मंजाबापू निमसे,व्ही.डी. काळे, अशोक धनवटे, शंकर साठे, छबु महांडुळे, तुकाराम कातोरे, भाऊराव गायकवाड, बाळासाहेब पानसंबळ, पप्पू कोल्हे, संजय पाटील, विकास रोहोकले, गौरव नरवडे, विलास होळकर, वसंत ठोकळ, सुरेश ढवळे, अंकुश काळे, राजकुमार आघाव, प्रदीप धुंगार्ड, दिलीप नाट, प्रशांत साठे, भास्कर भोर, बबन भोर, संदिप खेसे, भानुदास लाळगे, धोंडीभाऊ रुपनर, कचरू कांडेकर, सुभाष परभणे, भानुदास भगत, राजू नरवडे, पप्पू ऊरमुडे, राधाकृष्ण वाळुंज, गजानन पुंड, गोरख काळे, भाऊ सोनवणे,दिपक कार्ले, राजेंद्र गावखरे, विलास जपकर, जनार्धन माने, अरुण लांडगे, महेश काळे,, गोकुळ जाधव, पोपट पुंड, नंदा शेंडगे, डॉ.बबनराव डोंगरे, प्रविण कोठुळे आदी. उपस्थित होते.
लंकेंच्या विजयाची चर्चा देशभरात - प्रा. गाडे
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके व शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे हे मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. निलेश लंके यांनी बलाढ्य सजल्या जाणार्या विखे पाटलांचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे लंकेंच्या विजयाची चर्चा फक्त महाष्ट्रातच नाही तर देशभरात झाली. येथील निवडणूक देशभरात चर्चेची ठरली असल्याचे जिल्हाप्रुख गाडे यांनी सांगितले. जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्वच मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे असल्याचे ते म्हणाले.
कर्डिलेंना पाडल्याशिवाय शांत बसणार नाही
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई निलेश लंके यांच्या प्रचारार्थ निमगाव येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी जिल्ह्यातील 12 ही मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक आणण्यासाठी प्रयत्न करायचे असल्याचे सांगत माझ्यावर नगर, पारनेर, श्रीगोंदा, राहुरीची जबाबदारी आहे. त्यामुळे चारही मतदारसंघातील उमेदवारांना निवडणूक आणणार असून राहुरीत शिवाजी कर्डिलेंना पाडल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे गाडे यांनी सांगितले.
३३ सरपंचांची उपस्थिती
४२ पैकी ३३ गावांचे सरपंच मेळाव्यास उपस्थित आहेत. मते वाया घालू नको असे आम्ही आमच्या सहकाऱ्याला सांगितले मात्र त्यांनी ऐकले नाही. मला आलेले अनुभव मी त्यांना सांगितले मात्र त्यात यश आले नाही. १२ पैकी ४ उमेदवार पाठींबा देण्यासाठी तयार आहेत. मात्र तो पाठींबा घ्यायचा की नाही हे सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवावे. नगर तालुक्यात साठ टक्के मते राणी लंके यांना मिळणार असून उर्वरीत ४० टक्के मते इतर उमेदवारांना मिळतील. मताधिक्य वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत.
माधवराव लामखडे
मा. जि. प. सदस्य
बहिण, मुलीला काहीतरी जास्त दिले पाहिजे
राणी लंके ही नगर तालुक्यातील मुलगी, बहिण आहे तिला काहीतरी जास्त दिले पाहिजे. नगर तालुक्यात सन २००७ पासून महाविकास आघाडी असून आम्ही एकत्रीत काम करतो आहोत. आज काही लोकांची महत्वाकांक्षा वाढली आहे. माधवराव, मी देखील निवडणूक लढविण्याचा अनुभव घेतला. म्हशीच्या शिंगात डोके घालू नको असे आम्ही आमच्या सहकाऱ्याला सांगितले होते मात्र त्याने ऐकले नाही. विरोधकांनी हिंदू धर्माची वाटणी केली असून ते थांबविण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले पाहिजे. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राचे वाटोळे झाले आहे. वैचारीक वाटोळे इतके झाले आहे की कोणाला कोणाची भिती राहिली नाही. पैशावर सत्ता हाती घेता येते असा विरोकांचा भ्रम होता मात्र लोकसभा निवडणूकीत खा. नीलेश लंके यांनी तो भ्रम दुर केला.
प्रताप पाटील शेळके
मा. सभापती, जिल्हा परिषद
Post a Comment