नगरच्या राजकारणात ट्विस्ट ; गाडे यांनी सांगितले निवडणुकीतून माघार घेण्याचे खरे कारण...



 शिवसेनेचे बंडखोर  उमेदवार प्रा . शशिकांत गाडे यांचा कळमकर यांना पाठिंबा / खा. निलेश लंके यांची यशस्वी शिष्टाई 

माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहर विधानसभा निवडणुकीत काल घडलेल्या अर्ज माघारीच्या नाट्यमय घड़ामोडीनंतर आज ( मंगळवारी ) पुन्हा राजकीय ट्विस्ट पाहयला मिळाला . महाआघाडीतुन बंडखोरी केलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा . शशिकांत गाडे यांनी आज महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अभिषेक कळमकर यांना पाठिंबा जाहिर केला.

यावेळी खा. निलेश लंके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर , माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे उपस्थीत होते. यावेळी प्रा. गाडे म्हणाले की, माघारीचा अर्ज चुकुन कार्यकत्यांच्या हातात राहिला . दुसरा अर्ज लिही पर्यत वेळ संपली. मात्र आता अभिषेक कळमकर यांना पाठिंबा देत असुन स्वतः उमेदवार समजुन सर्व शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत. खा . निलेश लंके यांनी महाआघाडीची एकजुट ठेऊन नगर शहर दहशत मुक्त करण्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याची विनंती केली. यावेळी बाळासाहेब बोराटे , योगिराज गाडे उपस्थीत होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post