रस्त्यांसंदर्भात खा. लंके मंत्री गडकरींच्या भेटीला ; सकारात्मक निर्णयाची गडकरी यांची ग्वाही



नगर-मनमाड रस्त्याच्या कामाबाबतही चर्चा 

माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर : दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांची कामे तसेच बहुचचत नगर-मनमाड रस्त्याच्या कामासंदर्भात खा. नीलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेउन सविस्तर चर्चा केली. लंके यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही मंत्री गडकरी यांनी दिली. 

  लोकसभा निवडणूकीपूर्वी खा. नीलेश लंके यांनी नगर-मनमाड रस्त्याच्या दुदर्शकडे लक्ष वेधले होते. नगर ते पाथड रस्त्याच्या रखडलेल्या कामासाठी त्यांनी नगर येथे उपोषण केल्यानंतर हे काम तात्काळ माग लागले होते तर नगर-मनमाड रस्त्याचे कामही माग लावण्याची ग्वाही मंत्री गडकरी यांनी दिली होती. त्यानुसार नगर-मनमाड रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सध्या सुरू आहे.

    नगर-मनमाड रस्त्याच्या कामाची नव्याने निविदा काढण्यात येणार असून ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तिथे काँक्रीटीकरणाचा रस्ता करण्याची मागणी खा. लंके यांनी केली असून मंत्री गडकरी यांनी ती स्विकारलीही आहे. या कामाबाबत खा. लंके यांनी मंत्री गडकरी यांच्याकडे काही महत्वपुर्ण बाबीही मांडल्या. 

   मतदारसंघातील काही रस्त्यांसाठीचे प्रस्तावही खा लंके यांनी या बैठकीत सादर केले. त्या कामांबाबत गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुचना देत पुढील कार्यवाही करण्यास सांगितल्याचे खा. लंके यांनी सांगितले. 

    लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून कामकाजाच्या पाहिल्याच दिवशी खा. नीलेश लंके हे कामाला लागले आहेत. इतर विभागासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यासाठी खा. लंके हे लवकरच मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post