भाळवणी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचारसभा; सुजय विखे यांची उपस्थिती
माय नगर वेब टीम
पारनेर :
पारनेरमध्ये श्रीगोंद्याची पुनरावृत्ती होणार असल्याचे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दरम्यान अपक्ष उमेदवार विजय औटी यांनी काशिनाथ दाते यांना पाठिंबा जाहीर केला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार काशिनाथ दाते सर यांच्या प्रचारार्थ भाळवणी येथे बाजार तळावर राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार व भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले की महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जात आहेत. प्रत्येक घटकाला न्याय देण्याची आमची भूमिका आहे. महायुती विषयी विरोधकांकडून चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. पारनेर विधानसभा मतदारसंघात अनेक जण इच्छुक होते. परंतु गेल्या ४० वर्षापासून तालुक्याच्या राजकारणात व समाजकारणात सक्रिय असलेले काशिनाथ दाते सर यांना उमेदवारी आम्ही दिली आहे. श्रीगोंद्यातील २०१४ चा पॅटर्न आम्ही पारनेर मध्ये राबविला आहे अपक्ष उमेदवार विजय औटी यांनी पाठिंब्यामुळे ताकद वाढली आहे.
यावेळी विजय औटी यांच्यावर बोलताना पवार म्हणाले विजुभाऊ तुम्ही किती अडचणीत आहात हे मला माहीत आहे. तुम्हाला कोणी अडचणीत आणले त्रास दिला हे आम्हाला माहीत आहे. निवडणूक होऊ द्या निकाल लागू द्या मग पाहू
यावेळी उमेदवार काशीनाथ दाते, सुजित झावरे पाटील, माजी नगराध्यक्ष विजय औटी, राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाळासाहेब नाहाटा, मधुकर उचाळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भाजप प्रदेश सदस्य विश्वनाथ कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेश अध्यक्ष संध्या सोनवणे, जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पारनेर तालुका अध्यक्ष विक्रम कळमकर, भाजपा तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, सचिन पाटील वराळ, लाडकी बहीण योजना समिती तालुका अध्यक्ष सुनिल थोरात, माजी सभापती गणेश शेळके, माजी सभापती आरुण ठाणगे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर, सरपंच पंकज करखिले, सरपंच मनोज मुंगसे, सरपंच लहू भालेकर, उपसरपंच शंकर बर्वे, सुभाष दुधाडे, सुभाष सासवडे, नगरसेवक पै. युवराज पठारे, दत्ता'नाना पवार, रिपाई तालुका अध्यक्ष राजेंद्र उबाळे, युवराज पाटील, सागर मैड, संग्राम पावडे, सुषमा रावडे, सोनाली सालके, वैशाली कर्नावट, किसन धुमाळ, दिलीप दाते, किरण कोकाटे, संतोष शेलार, विकास रोकडे, शिवाजी रोकडे, प्रसाद कर्नावट, अशोक चेडे, निवृत्ती वरखडे, कैलास नऱ्हे, वैभव नरसाळे, शेखर काशीद, सिध्दांत आंधळे, सतिश गायकवाड, आधी राष्ट्रवादी भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी विजुभाऊ औटी व काशिनाथ दाते समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारनेर तालुक्याची दडपशाही संपवण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील काशिनाथ दाते यांच्या पाठीशी पारनेरकरांनी उभे राहिले पाहिजे लोकसभेला घराणेशाहीचा माझ्या विरोधात प्रचार झाला ती घराणेशाही तर मग आता काय आहे. निवडणूक सर्वसामान्यांच्या अस्तित्वासाठीची व लोकतंत्र वाचवण्यासाठी आहे. सर्वांनी एकत्र येऊन सरांना मतदान करावे.
सुजय विखे (माजी खासदार)
Post a Comment