ढवळपुरी जिल्हा परिषद गटात खा. निलेश लंकेंची ताकद वाढली
माय नगर वेब टीम
पारनेर : पारनेर-नगर विधानसभा निवडणूकची रणधुमाळी सुरू आहे. खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी करत आहेत. तालुक्यातील अनेक दिग्गजनेते व कार्यकर्ते खासदार निलेश लंके यांच्या गटात प्रवेश करत आहेत. ढवळपुरी जिल्हा परिषद गटामध्ये माजी खासदार सुजय विखे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे माजी जिल्हा परिषद सदस्य व कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबासाहेब तांबे व शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख व माजी पंचायत समिती सदस्य विकास उर्फ बंडू रोहकले यांनी भाळवणी येथील राष्ट्रवादीच्या प्रचार सभेदरम्यान मोठे शक्ती प्रदर्शन करत नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करत महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई निलेश लंके यांना पाठिंबा दिला आहे.
यावेळी भूषणराजे होळकर महाराज, खासदार निलेश लंके, उमेदवार राणीताई निलेश लंके, शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, बाजार समिती सभापती बाबासाहेब तरटे, माधवराव लामखडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक घुले, मा. सभापती बाबासाहेब तांबे, विकास उर्फ बंडू रोहकले, सुरेश धुरपते, माजी सभापती सुदाम पवार, बाळासाहेब हाराळ, गंगाराम रोहकले, कारभारी पोटघन, ऍड. राहूल झावरे, संपत म्हस्के, सरपंच प्रकाश राठोड, डॉ. नितीन रांधवन, सरपंच सुमन तांबे, सरपंच लिलाबाई रोहकले, बबलू रोहकले, राजेश भनगडे, गणेश हाके, आप्पासाहेब शिंदे, भास्कर शिंदे, मोहन रोकडे, राजेंद्र चौधरी, दीपक गुंजाळ, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष सुवर्णा घाडगे, प्रियंका खिलारी, सुनीता झावरे, ज्योती रोडे, आदि यावेळी उपस्थित होते.
माजी सभापती बाबासाहेब तांबे हे गोरेगावचे असून त्यांच्या पत्नी सुमन तांबे या गोरेगावच्या सध्या लोकनियुक्त सरपंच आहेत तसेच विकास उर्फ बंडू रोहकले हे भाळवणी गावचे असून त्यांच्या मातोश्री लिलाबाई रोहकले या भाळवणी गावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत त्यामुळे ढवळपुरी जिल्हा परिषद गटातील दोन दिग्गज नेते खा. निलेश लंके गटात आल्यामुळे लंके यांची आता विधानसभेला ताकद वाढली असून राणीताई निलेश लंके यांना या दोन गावांमधून तसेच ढवळपुरी जिल्हा परिषद गटातून मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
माजी सभापती बाबासाहेब तांबे यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना ढवळपुरी जिल्हा परिषद गटामध्ये अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत विकास कामांच्या जोरावर त्यांचा ढवळपुरी जिल्हा परिषद गट तसेच पारनेर तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे. खासदार निलेश लंके गटात प्रवेश करून यापुढील काळात ढवळपुरी जिल्हा परिषद गट व गोरेगाव मध्ये अनेक विकास कामे करणार असल्याचे प्रवेश केल्यानंतर तांबे यांनी स्पष्ट केले. निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी माजी सभापती बाबासाहेब तांबे व माजी पंचायत समिती सदस्य विकास उर्फ बंडू रोहकले यांचे जोरदार स्वागत केले आहे.
बाबासाहेब तांबे यांची जुनी यंत्रणा लागली कामाला
माजी सभापती बाबासाहेब तांबे यांनी खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये भाळवणी येथे जाहीर प्रवेश केला आहे. राणीताई निलेश लंके यांच्या विधानसभेच्या प्रचाराला आता बाबासाहेब तांबे मित्र मंडळाचे सर्व जुने सहकारी तसेच गोरेगाव परिसरातील त्यांचे नातेवाईक मित्रपरिवार हे आता प्रचारात सक्रिय झाले असून राणीताई लंके यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी माजी सभापती बाबासाहेब तांबे यांची खऱ्या अर्थाने जुनी यंत्रणात कामाला लागली आहे.
Post a Comment