आमदार तनपुरे यांची तालुक्यातील विकास कामे ठरणार निर्णायक ! विजयाचा मार्ग होणार सुकर ; रोहित्र, सबस्टेशन रस्त्यांच्या कामांचा फायदा तनपुरे समर्थकांचा विश्वास

 माय अहिल्यानगर वेब टीम 


अहिल्यानगर : नगर तालुक्यात आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलेली विविध विकासकामे निवडणुकीत निर्णायक  ठरणार असून त्यांचा विजयाचा मार्ग सुकर होणार असल्याचा विश्वास तनपुरे समर्थकांमधून व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये नवीन रोहित्र, पिंपळगाव माळवी येथील सब स्टेशन, गावांतर्गत वाड्या वस्त्यांवरील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावल्याने आमदार तनपुरे यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळणार असून केलेल्या विविध विकास कामांमुळे तनपुरे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास तनपुरे समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.

     आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातून राहुरी- पाथर्डी- नगर मतदार संघात विविध विकास कामे मार्गी लागलेले आहेत. नगर तालुक्यातील अनेक गावांनी शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळत नव्हती. ओव्हरलोड मुळे वारंवार रोहित्र नादुरुस्त होत असत. त्यामुळे तनपुरे यांनी प्रथम शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळण्यासाठी अनेक नवीन रोहित्र बसवले. जेऊर येथील सबस्टेशनवर लोड जास्त होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे विजेअभावी हाल होत होते. त्यामुळे पिंपळगाव माळवी येथे नव्याने सब स्टेशन उभारून परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे.

      गावातील अंतर्गत रस्ते,  वाड्या वस्त्यांवरील रस्त्यांना प्राधान्य देऊन शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तनपुरे यांनी सदैव प्रयत्न केले. अनेक तलावांचे खोलीकरण, दुरुस्ती करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्याही दूर झाली आहे. कोरोना काळात केलेल्या सेवेचे ही नागरिकांनी कौतुक केले होते. सर्वसामान्य, शेतकरी, तळागाळातील कार्यकर्ते, महिला, तरुण यांच्या समस्या सोडविण्यात तनपुरे यांना यश मिळाल्याने त्यांच्या पाठीशी मतदार खंबीरपणे उभे राहणार असल्याचा विश्वासही तनपुरे समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आमदार प्राजक्त तनपुरे हे उच्चशिक्षित असल्याने आमदारकी तसेच मिळालेल्या मंत्रिपदातील सर्व खात्यांना न्याय देण्यात  तनपुरे निश्चितच यशस्वी ठरले आहेत. त्यांनी मतदारसंघात केलेली विकास कामे निश्चितच त्यांना विजयापर्यंत नेण्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. 

   तनपुरे यांच्या विजयासाठी तालुक्यातून गोविंद मोकाटे, रघुनाथ झिने, रामेश्वर निमसे, शरद झोडगे, उद्धवराव दुसुंगे, अमोल जाधव, किशोर शिकारे, भास्कर मगर, सागर गुंड, अजय गुंड,  इंद्रभान बारगळ, डॉ. राम कदम, सर्जेराव मते, संतोष पटारे, दत्तात्रय  डोकडे, बाजीराव आवारे, विलास काळे,  दिगंबर जरे, निखिल शेलार, सुशील कदम, श्रीकृष्ण धाडगे, अभिषेक भगत, निलेश कराळे,  नाथासाहेब चव्हाण  यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध कार्यकर्ते, विविध गावचे सरपंच, माजी सरपंच, सोसायटी पदाधिकारी, तरुण प्रचारात सक्रिय झालेले आहेत. तरुणांचा वाढता पाठिंबा ही तनपुरे यांच्यासाठी जमेची बाजू ठरत आहे.

___________________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post