शिवाजी कर्डिले सर्वसामान्यांच्या मनातील आमदार! विकास कामे अन् तरुणांचा वाढता पाठिंब्यामुळे विजय निश्चित !

 


शेतकरी, महिला, तरुण सर्वसामान्यांच्या समस्यांची जाण असणारे एकमेव नेतृत्व !

मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी कर्डिले यांना साथ द्या -  मधुकर मगर 

माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर : नगर -राहुरी -पाथर्डी मतदार संघात शिवाजी कर्डिले हे सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार आहेत. त्यांनी केलेली विकास कामे, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांच्या समस्यांची सोडवणूक अन् नगर पाथर्डी राहुरी तालुक्यातील तरुणांचा मोठ्या प्रमाणात मिळत असलेला प्रतिसाद यामुळे कर्डिले यांचा विजय निश्चित असून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना साथ देण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर मगर यांनी केले आहे.

         शिवाजी कर्डिले  यांनी शेतकरी कुटुंबातील तसेच कोणताही राजकीय वारसा नसताना राजकारणात गरुडझेप घेतली आहे. ती केवळ सर्वसामान्य नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्यामुळेच. सर्वसामान्यांच्या सुखदुःखात तसेच ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, तरुण यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आल्यामुळे मतदारांनी त्यांना भरभरून असे प्रेम दिले आहे. कर्डिले यांनी प्रत्येक समस्याचे निराकरण करण्याची कला, कसब आत्मसात केले असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कर्डिले यांच्याबद्दल मोठी सहानुभूती आहे. त्यांनी मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लावली आहेत.

            अखंडपणे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी भरत असलेला जनता दरबार पराभवानंतरही सुरूच होता. मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क, तरुणांनी हातात घेतलेली निवडणूक अन् विकासकामांना प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून कर्डिले यांनी प्रचारात देखील आघाडी घेतली आहे. त्यांना सर्वच स्तरांमधून मिळत असलेल्या पाठींब्यामुळे विरोधकांना आपला पराभव दिसु लागला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असुन खोटेनाटे आरोप करण्यात येत आहेत. महायुती सरकारच्या काळात झालेल्या कामांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न होताना दिसुन येत आहे. 

             आमदार, विविध खात्यांचे मंत्री पद असतानादेखील मतदारसंघाचा विकास करता आला नाही. आपले अपयश झाकण्यासाठी खोटी आश्वासने, जनतेची दिशाभूल, अपप्रचार, चुकीचे संदेश समाजात पसरविण्याचे काम विरोधकांकडून करण्यात येईल. परंतु कोणत्याही अमिषाला बळी अथवा अफवांवर विश्वास न ठेवता सर्वसामान्य नागरिकांच्या, गोरगरीब जनतेसाठी, महिला, तरुण यांच्या समस्यांचे निराकरण तसेच मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी कर्डिलेंशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कर्डिले यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी कर्डिले यांना साथ देण्याचे आवाहन मधुकर मगर यांनी केले आहे. 

_______________________

माजी मंत्री शिवाजी कर्डिले अनेक वर्षांपासून शेतकरी, महिला, तरुण, सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवत आलेले आहेत. ग्रामीण भागातील सर्व समस्यांची कर्डिले यांना जाण असल्याने मतदारांचाही कर्डिले यांनी विश्वास संपादन केलेला आहे. केवळ निवडणुकीपुरते घराबाहेर पडणारे कोण अन् सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारे कोण हे मतदारांना चांगलेच माहीत झाल्याने कर्डिले यांचा विजय निश्चित असल्याचे मत महायुतीच्या कार्यकर्त्यांमधुन व्यक्त करण्यात येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post