मतदार संघाच्या विकासासाठी कर्डिलेंशिवाय पर्याय नाही !; धनशक्तीच्या जोरावर पाठिंबा घेणाऱ्यांचा पराभव निश्चित!



 गावोगावी स्वयंस्फुर्तीने होणारा प्रचार अन् मिळणाऱ्या वाढत्या पाठिंबामुळे विरोधकांची चलबिचल ! /खोसपुरी पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांचा विश्वास

 माय नगर वेब टीम 

 अहिल्यानगर : नगर- राहुरी- पाथर्डी मतदारसंघात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे विरोधकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. पराभव दिसू लागल्याने  विविध मंडळे, प्रतिष्ठान, तरुण कार्यकर्त्यांना आर्थिक अमिष देऊन पाठिंब्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा 'प्रताप' विरोधकांकडून सुरू आहे. परंतु मतदार सुज्ञ झाले असून कितीही धनशक्तीचा वापर केला तरी आता उपयोग होणार नाही. शिवाजी कर्डिले  मतदारसंघातील नागरिकांच्या मनात बसले असून त्यांच्या नेतृत्वाखालीच मतदारसंघाचा विकास आणि सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण होणार असल्याची खात्री मतदारांना झाली आहे. विरोधकांनी कितीही अमिष, प्रलोभने, आश्वासने दिली तरी कर्डिले हेच आमदार होणार असल्याचा ठाम विश्वास खोसपुरी गावचे माजी सरपंच तथा युवा नेते सोमनाथ हारेर यांच्यासह पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

            मतदारसंघातील जनतेकडून मागील पंचवार्षिक निवडणुकीत झालेल्या चुकीची फळे पाच वर्ष मतदारसंघांनी भोगले आहेत. त्यामुळे जनतेमध्ये चीड निर्माण झाली असून गावोगावी कार्यकर्ते मतदार स्वयंस्फूर्तीने कर्डिले यांचा प्रचारात उतरलेले दिसून येत आहेत. कर्डिले यांनी पद नसताना देखील महायुती सरकारच्या काळात पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून भरीव निधी आणून विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. महायुती सरकारने दिलेला निधी आणि त्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचे श्रेय घेण्याचा उद्योग विरोधकांकडून सुरू आहे. परंतु मतदार संघात झालेल्या विकास कामांचा सर्व हिशोब सर्वसामान्य जनतेकडे आहे.

         कितीही धनशक्ती, दहशतीचा वापर केला तरी जनता आता तुम्हाला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. दहशत, गुन्हेगारीचा आरोप करण्याअगोदर स्वतः आत्मपरीक्षण करावे असेही हारेर यांनी सांगितले.

       आपला सर्व  हिशोब मतदारसंघातील जनताच तुम्हाला मतदानातुन देणार आहे. कर्डिले यांचा विजय निश्चित असून मतदारांनीच निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे आता तुमच्या कोणत्याही अमिषाला मतदार बळी पडणार नसल्याचा विश्वास सोमनाथ हारेर, धर्मनाथ आव्हाड, बापूसाहेब आव्हाड, बाबाभाई शेख, अमित आव्हाड,  देविदास आव्हाड, अविनाश आव्हाड, भिमराव आव्हाड, जाकीरभाई शेख, आसाराम वाघमोडे,  रशीदभाई शेख, विजय भिसे, भारत देवकर यांनी व्यक्त केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post