राणी लंके यांना पाठिंब्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची रीघ! ; बिनशर्त पाठिंबा देत मोठे मताधिक्य देण्याची ग्वाही



 माय नगर वेब टीम 

पारनेर :  महाविकास आघाडीच्या  उमेदवार तथा खा. नीलेश  लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना पाठिंबा देण्यासाठी विविध गावांतील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची रीघ लागली असून रविवारी घाणेगांव, यादववाडी तसेच टाकळी ढोकेश्वर येथील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत राणी लंके यांना बिनशर्त पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. दरम्यान, यापूवही काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लंके यांना पाठिंबा जाहिर केला असून पुढील काही दिवसांत अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते लंके यांची साथ देणार असल्याचे सांगण्यात आले. 

     लोकसभा निवडणूकीत आमदार नीलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी केली व निवडणूक जिंकलीही. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासारख्या बलाढय उमेदवाराला धुळ चारीत लोकसभेत पोहचलेल्या खा. नीलेश लंके यांना त्यांच्या पारनेर-नगर मतदारसंघात रोखण्यासाठी विखे यांच्याकडून प्रतिष्ठा पणाला लावण्यात आली होती. विखे  यांनी याच मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करून लंके यांना स्वतःच्या  होम ग्राउंडमध्येच घेरण्याचा विखे यांनी प्रयत्न केला खरा, मात्र लंके यांनी या मतदारसंघात भक्कम आघाडी घेत विखे यांना धोबीपछाड दिली होती. काही मोजक्या बुथचा अपवाद सोडला तर लंके यांनी प्रत्येक बुथवर आघाडी घेत या मतदारसंघावर आपलाच प्रभाव असल्याचे  दाखवून दिले होते. 

     विखे यांच्यासारख्या बलाढय उमेदवाराने प्रतिष्ठा पणाला लाऊनही लंके यांना लोकसभा निवडणूकीत त्यांना रोखता न आल्याने लोकसभा निवडणूकीत विखे यांना साथ देणारे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांना सोडून विधानसभेच्या उमेदवार राणी लंके यांना बिनशर्त पाठिंबा देत आहेत. 

घाणेगावं येथील विद्यमान उपसरपंच विशाल वाबळे यांच्यासह अविनाश परांडे, संदीप वाबळे, अमोल वाबळे, पवन वाबळे, तुकाराम म्हस्के, प्रकाश शिंगोटे, महेश शिंदे, दिपक गायकवाड, देवेंद्र शिंगोटे यांनी तसेच यादववाडीचे ग्रामपंचायत सदस्य सागर तरडे, मा. ग्रामपंचायत सदस्य अतुल तरडे यांनी खा. लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बिनशर्त प्रवेश करीत राणी लंके यांच्या प्रचारात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला. 

      टाकळी ढोकेश्वर येथील संकेत थोपटे, नितीन निवडूंगे, दादाभाऊ निवडूंगे, प्रविण थोपटे, अक्षय निवडूंगे, मंगेश निवडूंगे, आबा थोपटे, सागर थोपटे, दिपक थोपटे, दादाभाऊ पाचपुते, सुभाष निवडूंगे, निलेश थोपटे, राजू थोपटे यांनीही खा. लंके यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत राणी लंके यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहिर केला. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post