शिवसैनिक संदेश कार्ले यांची पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात डरकाळी, काय केलाय दावा पहा...

 


माय नगर वेब टीम 

पारनेर ः पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी अपक्ष उमेदवारी करून चुरस निर्माण केली आहे. त्यांनी दोन्ही तालुक्यातील गावांमध्ये रॅली काढून मतदारांशी संपर्क साधला आहे. विशेष म्हणजे यांनी या प्रचारादरम्यान, कोणावरही टीका-टिपन्नी केलेली नाही. त्यामुळे कार्ले यांच्या कुकरच्या शिट्या चांगल्याच वाजल्या आहेत.

अपक्ष उमेदवार संदेश कार्ले निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहेत. त्यांनी आपण काय कामे केली व आगामी पाच वर्षात काय कामे करणार आहे, याचा लेखाजोखा मांडला आहे.

नमस्कार. 

मी संदेश कार्ले,

मी राजकारणात भाग घेण्याचे ठरवले, मी २००६-०७ मध्ये जिल्हा परिषद निवडणूकीच्या निमित्ताने शिवसेना व आघाडीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. आपल्या सर्वाच्या आशिर्वादाने मी निवडूनही आलो. हा माझा राजकीय जन्म होय. वडणुकीनंतर माझ्या मनात राजकारणाचा असलेला तिरस्कार डावलून काम करण्याची उर्मी आली होती. कारण जनतेने त्यावेळच्या नगर तालुक्यातील लोकांच्या केलेल्या मोठ्या प्रेमाच्या वर्षावामुळे माझे काहीही कर्तृत्व नसतानाही मायबाप जनता जनार्धनाने माझ्यावर मोठा विश्वास दाखवला होता. त्याची जाणीव सदैव माझे मनात होती. आजही आहे. यापुढेही राहील म्हणून नेत्यांच्या शिकवणीने व आई- वडील, शिक्षकांच्या संस्कारामुळे राजकारणात मनापासून चांगले काम करण्याचे ठरविले.


मी काम करताना प्रामुख्याने शिक्षण, शेतकरी व ग्रामविकास या गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रीत केले. शिक्षणात काम करताना तालुक्यातील शाळेच्या जुन्या इमारती नव्या करण्यावर भर दिला. कामरगाव गावातील शाळा खोली जिला दोन इंचाची फट असतानाही मी देऊ शकत नव्हतो. त्यावरुन अभ्यासाने मी षटकोनी खोल्या न बांधता सरळ चौकोनी बांधने व मंजूर करण्यासाठी अतिरिक्त ऐवजी मोडकळीस वातावरण निर्माण करण्यास जनतेच्या वतीने मदत झाली.


आलेल्या शाळा खोल्याही नवीन बांधण्यास जिल्हा परिषदेकडून मंजुरी मिळवली व सर्व शाळा खोल्या नविन केल्या तसेच शाळेचे आनंददायी आज नगर तालुक्यातील काही अपवाद वगळता बहुतेक सर्व शाळा खोल्या नवीन करण्यात आपण सर्वाच्या, नेत्यांच्या व अधिकाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीही झालो. तालुक्यातील जवळजवळ १४० ते १५० प्राथमिक शाळांच्या वार्षिक स्नेहसंमेलनास मी उपस्थित राहिलो. 


आपल्या ग्रामीण भागास जनतेच्या सहभागाची शिक्षणाची चळवळ शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती पालक पदाधिकारी व या सर्वाच्या सहकार्याने सुरु झाली. आज रोजी तालुक्यातील ६७ शाळांना ISO मानांकन प्राप्त झाले आहे. विद्यार्थी संख्येत झालेली वाढ हे सर्वाच्या एकत्रित प्रयत्नाचे व माझे उद्दिष्टांचे फळ आहे असे वाटते.


शेतकरी हा तर जगाचा पोशिंदाच, आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे. हे मला आपणास सांगण्याची आवश्यकता नाही. अवेळी पडणारा पाऊस, पाणी टंचाई, विजेची टंचाई, लहरी हवामान यातून मिळवलेले उत्पादन, त्यासही उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळेल, याची शाश्वती नाही. म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न केले, शेतीवर काम करताना शेतकऱ्यांना आचानक कमी होणारे कांद्याचे भाव या विषयावर मोठा संघर्ष व आंदोलन करताना एकदा मला मारहाणही झाली. ती मी सहन केली. 


मनात असलेली इच्छाशक्ती, शेतकऱ्यांना कांदा गोणीचे पैसे मिळावे, असा कायदा होता. यांची अंमलबजावणी करावी म्हणून ही मोठे आंदोलने केली शेवटी एका संघर्षातून सरकारने तो कायदा अंमलबजावणी ऐवजी रद्द केला. त्या आंदोलनाने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले, व त्या कारणाने सरकारने माझ्यावर तडीपारची कार्यवाही करण्याची तयारीही केली होती.


तालुक्यात ग्रामीण जनतेच्या विकासासाठी सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या योजना पंचायत समितीच्या माध्यमातून पारदर्शीपणे व प्रभावीपणे राबविल्या सार्वजनिक कामात तेरावा वित्तआयोग, चौदावा वित्त आयोग, (बी. आर. जी. एफ.) मागास क्षेत्र अनुदान निधी, दलित वस्ती जनसुविधा, पंचायत समिती सेस या योजनाचा प्रभावी उपयोग केला.


वैयक्तीक योजनांमध्ये इंदिरा आवास योजना घरकुले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांमधून शौचालय व विहिरी, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचायल, समाज कल्याण विभागाअंर्तगत शिलाई मशिन, महिला बालकल्याण विभागातील सायकल तसेच इतर योजना प्रभावीपणे राबविले आहेत. 


पंचायत समितीच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी म्हणून आपण चिचोंडी पाटील येथील पाणी पुरवठा योजनेला केलेले सोलर हे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याचे उत्तम उदाहरण गेल्या तीन वर्षापासून एकही रुपया खर्च न करता चालू आहे. यावरुन मी शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवून रात्री पाणी भरण्याचे कष्ट कमी करु शकतो.


शेतकऱ्यांसाठी विजेच्या संदर्भातही विद्युत वितरण कंपनीवर शेतकऱ्यांच्या वतीने छोटे-मोठे गेट बंद आंदोलन, अधिकाऱ्यांना घेराव, खुर्चा बाहेर घेणे असे अनेक आंदोलने करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पिकांची चुकीची आणेवारी त्यामुळे शेतकऱ्यांना न मिळणारा पीक विमा या संदर्भात जेष्ठांचे मार्गदर्शन घेऊन अधिकाऱ्यांबरोबर काम केले. 



शेतीसाठी विविध ठिकाणी बंधाऱ्याची कामे, पाझर तलाव दुरुस्तीची व शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव (M.S.P.) मिळण्याकरीता मी शेअर मार्केट प्रमाणे कृषी निर्देशकांची कल्पना राबविल्यास शेतकऱ्यांचे कमी भाव होण्यापासून नुकसान होणार नाही. कांदा, दूध हे शेतकऱ्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. त्यामुळे त्यांना स्थिर वाजवी बाजारभाव आवश्यक आहे, ते सक्षमपणे करु शकतो असा विश्वास आहे. शेतीमालासाठी हमी भाव यासाठी खूप मनापासुन प्रामाणिक प्रयत्न केला व सदैव करणार आहे.


सरकारी पेन्शन धारकांना वेळेवर न मिळणारी पेन्शन व त्यांची बँकेत होणारी अवहेलना यासाठी लवकर पेन्शन मिळावी म्हणून जिल्हा परिषदमध्येही आंदोलन करुन त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याच प्रयत्न केला. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा, मा. खासदार साहेबांच्या होणाऱ्या दक्षता सनियंत्रण सभांमध्ये सातत्याने सर्वसामान्यांच्या वतीने आवाज उठविला. आपल्या आशिर्वादाने जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये दर्जेदार साहित्यासाठी मोठा संघर्ष केला. व दर्जेदार साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले.


या वर्षात उल्लेखनीय काम मागील सलग ३ ते ४ वर्षात असलेला दुष्काळात पंचायत समितीमधून जिल्ह्यात सर्वात जास्त मंजुर टँकरच्या ट्रिपा करणारा आपला तालुका आहे. मंजूर होणारे टँकर व त्याची भरण्याची सोय त्यासाठी उद्भव पाणी भरण्याच्या ठिकाणी स्वतः अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. पूर्णवेळ मनापासून स्वतः लक्ष देऊन जि.प. पं.सं सदस्य नेते मंडळी व जनतेच्या सहकार्यान केली. 


पूर्वी वारंवार बंद पडणारी घोसपुरी योजना व्यवस्थित चालू शकते, हे सलग आठ महिने रात्र दिवस न पाहता अगदी पहाटे ४ पर्यंत सर्वाच्या सहकार्याने काम केले. सदर योजनेत आज रोजी सुमारे ११५ लाख रुपये बँक बॅलन्समध्ये आली. नियमित विजबिल व कामगाराना वेळेवर पगार देणारी दुर्मिळ अशी घोसपुरी पाणी पुरवठा समिती आहे की जी आज नफ्यात आहे. वाया जाणारे पाणी शेतकऱ्यांना देऊन त्यांच्या फळबागा जगल्याने आम्हांस आनंद होत आहे. घोसपुरी योजनेच्या यशामध्ये लाभार्थी, सर्व गावाचे सरपंच, कार्यकर्ते, सामान्य जनता यांचा खुपमोठा मोलाचा वाटा आहे.


अशुध्द पाणी पिल्याने मनुष्याला किती व कोणते आजार होतात हे आपण डॉक्टरांना विचारा अथवा अनुभवलेही असेल त्या करीता मी पारनेर शहरासह इतर सुमारे २५-३० गावांना पिण्याचे शुध्दपाणी देण्याची पाणी योजना सर्वेक्षण केलेली आहे त्यात काही बदल होऊ शकतात यातुन माता-भगिनींच्या डोक्यावरचा हंडा कायम स्वरुपी उतरवु शकतो.


तालुक्यातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी जे शिक्षणासाठी शहरात येतात त्याच्यासाठीही एसटीसाठी टपावर बसून येऊन मंत्र्याना आडवून, रस्ता रोको करुन एसटीची सोय करण्याचा प्रयत्न केला. शासकिय रुग्णालय, खाजगी रुग्णालय तसेच जनतेस अपघात समई अनेकांना रात्री-बेरात्री केलेली मदत हि माझी खूप मोठी जमेची बाजू आहे, असे मला वाटते.


एकूणच ज्या जनता जनार्धनांच्या जीवावर व आशिर्वादावर ही पदे मिळाली त्याची सदैव जाणीव माझ्या मनात आहे आणि सदैव राहील याची मी खात्री देतो. एकंदरीत काम करताना प्राथमिक शाळेतील विद्यार्थी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी शेतकरी व सर्वसामान्य जनता यांच्या हाकेला अगदी २४ तास ३६५ दिवस सेवा यासाठी संदेश कार्लेला आपला आशिर्वाद हवा हा मूलमंत्र घेऊन शेवटच्या श्वासापर्यत जाणीव ठेवीण याची मी हमी देतो. कारण 'तुमचा विश्वास हाच माझा श्वास' हे मी समजतो, असे संदेश कार्ले म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post