माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी अपक्ष उमेदवारी केल्याने मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार राणीताई लंके, महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते व कार्ले यांच्या मोठी चुरस निर्माण झाली आहे.
कामाचा माणूस म्हणून संदेश कार्ले यांची ओळख असल्याने त्यांना मतदारसंघातील प्रत्येक गावात उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच कार्ले यांनी वचननामा प्रसिद्ध केला असून निवडणूक लढविण्याचे कारण जनतेसमोर मांडले आहे.
काय म्हटले आहे वचननाम्यामध्ये पाहुयात...
प्रिय माता बंधू भगिनींनो, मी संदेश तुकाराम कार्ले माझे मनोगत आपणापर्यंत पोहचवत आहे.
आपण राजकारणाला चांगले समजतो का वाईट ? मी तर वाईटच समजत होतो. परंतु चाणक्याच्या म्हणण्यानुसार 'चांगल्या माणसाने राजकारण न करणे म्हणजे मुर्खाच्या हातात सत्ता देणे होय', म्हणून मी राजकारणात भाग घेण्याचे ठरवले, मी २००६-०७ मध्ये जिल्हा परिषद निवडणूकीच्या निमित्ताने शिवसेना व आघाडीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला व आपल्या सर्वाच्या आशिर्वादाने मी निवडूनही आलो.
हा माझा राजकीय जन्म होय निवडणूकी नंतर माझ्या मनात राजकारणाचा असलेला तिरस्कार डावलून काम करण्याची उर्मी आली होती कारण जनतेने त्यावेळ च्या नगर तालुक्यातील लोकांच्या केलेल्या मोठ्या प्रेमाच्या वर्षावामुळे माझे काहीही कर्तृत्व नसतांनाही मायबाप जनता जनार्धनाने माझेवर खुप मोठा विश्वास दाखवला होता त्याची जाणिव सदैव माझे मनात होती, आजही आहे व यापुढेही राहील म्हणून नेत्यांच्या शिकवणीने व आई- वडिल, शिक्षकांच्या संस्कारामुळे राजकारणात मनापासुन चांगले काम करण्याचे ठरविले.
मी काम करताना प्रामुख्याने शिक्षण, शेतकरी व ग्रामविकास या गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रीत केले. शिक्षणात काम करताना तालुक्यातील शाळेच्या जुन्या इमारती नष्या करण्यावर भर दिला. कामरगांव गावातील शाळा खोली जीला दोन इंचाची फट असतानाही मी देऊ शकत नव्हतो. त्यावरुन अभ्यासाने मी षटकोनी खोल्या न बांधता सरळ चौकोनी बांधने व मंजूर करणेसाठी अतिरिक्त ऐवजी मोडकळीस आलेल्या शाळा खोल्याही नविन बांधणेस जिल्हा परिषदेकडून मंजुरी मिळवली व सर्व शाळा खोल्या नविन केल्या तसेच शाळेचे आनंददायी वातावरण निर्माण करण्यास जनतेच्या वतीने मदत झाली. आज नगर तालुक्यातील काही अपवाद वगळता बहुतेक सर्व शाळा खोल्या नविन करण्यात आपण सर्वाच्या, नेत्यांच्या व अधिकाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीही झालो. तालुक्यातील जवळजवळ १४० ते १५० प्राथमिक शाळांच्या वार्षिक स्नेहसंमेलनास मी उपस्थित राहीलो व आपल्या ग्रामिण भागास जनतेच्या सहभागाची शिक्षणाची चळवळ शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती पालक पदाधिकारी व या सर्वांच्या सहकायनि सुरु झाली. आज रोजी तालुक्यातील ६७ शाळांना ISO मानांकन प्राप्त झाले आहे विद्यार्थी संख्येत झालेली वाढ है सर्वाच्या एकत्रित प्रयत्नाचे व माझे उद्दिष्टांचे फळ आहे असे वाटते.
शेतकरी हा तर जगाचा पोशिंदाच, आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे हे मला आपणांस सांगण्याची आवश्यकता नाही अवेळी पहणारा पाऊस, पाणी टंचाई, विजेची टंचाई, लहरी हवामान यातुन मिळवलेले उत्पादन, त्यासही उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळेल याची शाश्वती नाही, म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न केले, शेतीवर काम करताना शेतकऱ्यांना आचानक कमी होणारे कांद्याचे भाव या विषयावर मोठा संघर्ष व आंदोलन करताना एकदा मला मारहाणही झाली. ती मी सहन केली. कारण मनात असलेली इच्छाशक्ती, शेतकऱ्यांना कांदा गोणीचे पैसे मिळावे असा कायदा होता यांची अंमलबजावणी करावी म्हणून ही मोठे आंदोलने केली शेवटी एका संघर्षातुन सरकारने तो कायदा अंमलबजावणी ऐवजी रद्द केला. त्या आंदोलनाने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले, व त्या कारणाने सरकारने माझ्यावर तडीपारची कार्यवाही करण्याची तयारीही केली होती.
तालुक्यात ग्रामिण जनतेच्या विकासासाठी सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या योजना पंचायत समितीच्या माध्यमातुन पारदर्शीपणे व प्रभावीपणे राबविल्या सार्वजनिक कामात तेरावा वित्तआयोग, चौदावा वित्त आयोग, (बी. आर. जी. एफ.) मागास क्षेत्र अनुदान निधी, दलित वस्ती जनसुविधा, पंचायत समिती सेस या योजनाचा प्रभावी उपयोग केला.
वैयक्तीक योजनांमध्ये इंदिरा आवास योजना घरकुले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना मधून शौचालय व विहीरी, स्साच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तीक शौचायल, समाज कल्याण विभागाअंर्तगत शिलाई मशिन, महिला बालकल्याण विभागातील सायकल तसेच इतर योजना प्रभावीपणे राबविले आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचा प्रयत्न केला.
शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी म्हणुन आपण चिचोंडी पाटील येथील पाणी पुरवठा योजनेला केलेले सोलर हे शेतकऱ्यांना दिवसा बीज मिळण्याचे उत्तम उदाहरण गेल्या तीन वर्षापासून एकही रुपया खर्च न करता चालु आहे यावरून मी शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवून रात्री पाणी भरण्याचे कष्ट कमी करु शकतो.
शेतकऱ्यांसाठी विजेच्या संदर्भातही विद्युत वितरण कंपनीवर शेतकऱ्यांच्या वतीने छोटे-मोठे गेट बंद आंदोलन, अधिकाऱ्याऱ्यांना घेराव, खुर्चा बाहेर घेणे असे अनेक आंदोलने करून शेतकयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पिकांची चुकीची आणेवारी त्यामुळे शेतकऱ्यांना न मिळणारा पीक विमा या संदर्भात जेष्ठांचे मार्गदर्शन घेवून अधिकाऱ्यांबरोबर काम केले. शेतीसाठी विविध ठिकाणी बंधाऱ्याची कामे, पाझर तलाव दुरुस्तीची व शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव (M.S.P.) मिळण्याकरीता भी शेअर मार्केट प्रमाणे कृषी निर्देशकाची कल्पना राबविल्यास शेतकन्यांचे कमी भाव होण्यापासून नुकसान होणार नाही उदा कांदा, दुध हे शेतकऱ्याऱ्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. त्यामुळे त्यांना स्थिर बाजवी बाजारभाव आवश्यक आहे व ते सक्षमपणे करु शकतो असा विश्वास आहे शेतीमालासाठी हमी भाव यासाठी खूप मनापासुन प्रामाणिक प्रयत्न केला व सदैव करणार आहे.
सरकारी पेन्शन धारकांना वेळेवर न मिळणारी पेन्शन व त्यांची बँकेत होणारी अवहेलना यासाठी लवकर पेन्शन मिळावी म्हणून जिल्हा परिषदमध्येही आंदोलन करून त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याच प्रयत्न केला. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा, मा. खासदार साहेबाच्या होणाऱ्या दक्षता सनियंत्रण सभांमध्ये सातत्याने सर्वसामान्यांच्या वतीने आवाज उठविला आपल्या आशिर्वादाने जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये दर्जेदार साहित्यासाठी मोठा संघर्ष केला व दर्जेदार साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले.
या वर्षात उल्लेखनीय काम मागील सलग ३ ते ४ वर्षात असलेला दुष्काळात पंचायत समितीमधुन जिल्ह्यात सर्वात जास्त मंजुर टैंकरध्या ट्रिपा करणारा आपला तालुका आहे. मंजुर होणारे टेंकर व त्याची भरण्याची सोय त्यासाठी उद्भव पाणी भरण्याच्या ठिकाणी स्वतः अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली पूर्णवेळ मनापासुन स्वतः लक्ष देऊन जि.प. प.सं सदस्य नेते मंडळी व जनतेच्या सहकार्यान केली. पूर्वी वारंवार बंद पडणारी घोसपुरी योजना व्यवस्थित चालु शकते हे सलग आठ महिने रात्र-दिवस न पाहता अगदी पहाटे ४ पर्यंत सर्वाच्या सहकायनि काम केले व सदर योजनेत आज रोजी सुमारे ११५ लाख रुपये बँक बॅलन्समध्ये आली, नियमित विज बिल व कामगाराना वेळेवर पगार देणारी दुर्मिळ अशी घोसपुरी पाणी पुरवठा समिती आहे की जी आज नफ्यात आहे, वाया जाणारे पाणी शेतकऱ्याऱ्यांना देऊन त्यांच्या फळबागा जगल्याने आम्हांस आनंद होत आहे घोसपुरी योजनेच्या यशामध्ये लाभार्थी, सर्व गावाचे सरपंच, कार्यकर्ते, सामान्य जनता यांचा खुपमोठा मोलाचा वाटा आहे.
अशुध्द पाणी पिल्याने मनुष्याला किती व कोणते आजार होतात हे आपण डॉक्टरांना विचारा अथवा अनुभवलेही असेल त्या करीता मी पारनेर शहरासह इतर सुमारे २५-३० गावांना पिण्याचे शुध्दपाणी देण्याची पाणी योजना सर्वेक्षण केलेली आहे त्यात काही बदल होऊ शकतात.यातुन माता-भगिनींच्या डोक्यावरचा हंडा कायम स्वरूपी उतरवु शकतो. तालुक्यातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी जे शिक्षणासाठी शहरात येतात त्याच्यासाठीही एस.टी साठी टपावर बसुन येऊन मंत्र्याना आडवून, रस्ता रोको करुन एस.टी ची सोय करण्याचा प्रयत्न केला शासकिय रुग्णालय, खाजगी रुग्णालय तसेच जनतेस अपघात समई अनेकांना रात्री-बेरात्री केलेली मदत हि माझी खुप मोठी जमेची बाजु आहे असे मला वाटते.
एकूणच ज्या जनता जनार्धनांच्या जीवावर व आशिर्वादावर ही पदे मिळाली त्याची सदैव जाणीव माझ्या मनात आहे आणी सदैव राहील याची मी खात्री देतो. एकंदरीत काम करताना प्राथमिक शाळेतील विद्यार्थी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी शेतकरी व सर्वसामान्य जनता यांच्या हाकेला अगदी २४ तास ३६५ दिवस सेवा यासाठी संदेश कार्लेला आपला आशिर्वाद हवा हा मूलमंत्र घेऊन शेवटच्या वासापर्यंत जाणीव ठेवीण याची मी हमी देतो. कारण 'तुमचा विश्वास हाच माझा धास' हे मी समजतो.
जय महाराष्ट्र....!
आपला माणुस आपल्यासाठी...
Post a Comment