महायुतीचे उमेदवार आ. जगताप यांच्या प्रचारार्थ शिवसेना व भाजप सरसावली



रेल्वे स्टेशन रोड, आगरकर मळा परिसरातून काढली एकत्रित रॅली  

शहर विकासाच्या हाकेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नगरकर राजकारणापेक्षा विकासकरणाला साथ देणार -अनिल शिंदे

माय नगर वेब टीम 

अहमदनगर : नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ शहरात शिवसेना व भाजप सरसावली असून, रेल्वे स्टेशन रोड, आगरकर मळा परिसरात भाजप, सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित प्रचार फेरी काढली. या प्रचार फेरीत सहभागी होऊन आ. संग्राम जगताप यांनी नागरिकांच्या गाठी-भेटी घेऊन मतदारांना शहराच्या विकासासाठी पुन्हा संधी देण्याची साद घातली. 

       शहर विकासाची हाक देत काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीस सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे व भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांनी या प्रचार रॅलीचे नेतृत्व केले. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव, अनिल लोखंडे, भिंगार शहर प्रमुख सुनील लालबोंद्रे, रवींद्र लालबोंद्रे, संजय छजलाने, युवा सेनेचे योगेश गलांडे, आकाश कातोरे, भाजपचे ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, सचिन पारखी, शहर सचिव दत्ता गडाळकर, विशाल खैरे, विजय गायकवाड,  प्रशांत मुथा, महेश नामदे, पंडीत वाघमारे, प्रिया जानवे, बाबसाहेब सानप, सचिन राऊत, विकी लोखंडे, सचिन लोखंडे, सुनील भिंगारदिये, ओंकार शिंदे, अविनाश भिंगारदिवे, अंगद महानवर, रणजीत परदेशी, प्रल्हाद जोशी, शिवसेना महिला शहर प्रमुख ॲड. पुष्पाताई येळवंडे, तृप्ती साळवे, सलोनी शिंदे, सुनीता बाहुले, सविता कोटा, राहुल रासकर, गोपाळ वर्मा, सुहास पातरकर, अजय ढोणे, नरेंद्र कुलकर्णी, गणेश जाधव, संतोष शिरसाठ, महेश आल्हाड, साहिल शेख, कुंडलिक गधादे, बाबासाहेब रोडे, विकास घोरपडे, सोनू साठे, रुपेश इरकल, अक्षय शिंदे, दादा कांबळे, भैय्या नागवडे, विनीत झरेकर, रोहित सुपेकर, गणेश मोकाटे, विरेंद्र राजपुत, सनी ढगे, भागवत कुर्धने, दीपक भालेराव, सुरेश देठे, मुन्ना पंचमुख, संतोष भालेराव, रोहीत गुंजाळ, श्‍वेता पंधाडे, ज्योती दांडगे, राखी आहेर, अर्चना बनकर, निता फाटक, सीमा खंदारे, सुजाता पुजारी, संध्या पावसे, अजय गाडे, बाळासाहेब भुजबळ, सुरेश लालबागे, मयूर बोचुघोळ, छाया राजपूत, कालंदी केसकर, श्रीकांत फंड, रोहीत पटारे, भांगे, चंदन बारटक्के, आदेश गायकवाड, करण कराळे, शुभम जाधव, ज्ञानेश्‍वर धिरडे आदींसह शिवसेना, भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

         शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे म्हणाले की, शहरातील शिवसेना व भाजपची शक्ती एकवटल्याने महायुतीच्या उमेदवार असलेले आ. जगताप यांचा विजय निश्‍चित आहे. नगरकर राजकारणापेक्षा विकासकरणाला साथ देणार आहे. शहराच्या विकासाला मोठी चालना मिळाली असून, केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीतून मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आलेली आहे. नगरकरांना विकासाचे व्हिजन असलेले आ. जगताप यांच्या सारखे नेतृत्व हवे असल्याचे त्यांनी सांगितले.   

      भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांनी महायुतीचे उमेदवार आ. जगताप यांना निवडून आणण्यासाठी भाजपसह संपूर्ण महायुतीमधील घटक पक्ष एकवटले आहे. महायुतीचा उमेदवार निवडून आल्यस विकासाची घौडदौड अखंडपणे सुरु राहणार आहे. महायुतीच्या कल्याणकारी राज्यातून व निवडून आलेल्या उमेदवाराच्या माध्यमातून नगरकरांच्या अपेक्षा पूर्ण होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नागरिकांनी देखील आमाची विकासाला साथ राहणार असून, आ. जगताप यांच्या शिवाय दुसरा कोणताच सक्षम उमेदवार नसल्याची भावना व्यक्त केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post