शिवाजी कर्डिलेंसारख्या नेतृत्वासाठी भाग्य लागते ! जेऊरसह चापेवाडी, वाघवाडी येथे युवकांचा निर्धार !
कर्डिले यांना गावागावातून वाढता पाठिंबा : विरोधकांकडून बदनामीचे षडयंत्र
अहिल्यानगर : नगर तालुक्यातील जेऊर पंचक्रोशीत पै. संदीप कर्डिले यांनी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या विजयासाठी मतदारांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला. पै. संदीप कर्डिले यांच्या प्रचार दौऱ्यात जेऊरसह चापेवाडी, वाघवाडी येथील तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. येथील युवकांनी शिवाजी कर्डिलेंसारखे नेतृत्व मतदार संघाला मिळण्यासाठी भाग्य लागते. त्यांच्या नेतृत्वातूनच मतदार संघाचा कायापालट होणार असून विकासाची गंगा गावोगावी आणण्यासाठी कर्डिले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
नगर-पाथर्डी- राहुरी मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवाजी कर्डिले आमदार होण्याची गरज आहे. त्यांच्या कार्यकाळात झालेली विकास कामे तसेच आमदार नसताना देखील पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामांमुळे सर्वसामान्य मतदारांना कर्डिले यांच्या कार्याची माहिती आहे. त्यामुळेच गावागावातुन उस्फूर्तपणे कर्डिले यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. शेकडो तरुण दररोज कर्डिले यांचे नेतृत्व मान्य करून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तसेच ग्रामीण भागातील मतदारांच्या समस्यांची जाण असलेल्या कर्डिले यांना आमदार करण्याचा निर्धार येथील युवकांनी व्यक्त केला आहे.
पै. संदीप कर्डिले हे शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारात सक्रिय झाल्यानंतर मतदार संघातील तरुणांमध्ये नवचैतन्य आल्याचे पहावयास मिळत आहे. मतदारसंघातील गावोगावी कार्यकर्ते, मतदार, तरुण स्वयंस्फुर्तीने कर्डिले यांचा प्रचार करताना दिसून येत आहेत. विरोधकांकडून कर्डिले यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. परंतु त्याचा उपयोग होणार नाही. असा विश्वासही तरुणांनी व्यक्त केला. जेऊर, चापेवाडी, वाघवाडी, धनगरवाडी व पंचक्रोशीतील गावांमध्ये संदीप कर्डिले यांनी मतदारांशी संवाद साधला.
यावेळी बाजीराव गवारे, मधुकर मगर, बंडू पवार, मनोज कोथिंबीरे, बाबासाहेब तोडमल, दिनेश बेल्हेकर, आप्पा बनकर, सोमनाथ तोडमल, भानुदास हसणाळे, आदिनाथ बनकर, अनिल ससे, राजेंद्र तोडमल, राजू बनकर, एकनाथ वाघ, साहेबराव वाघ, संदीप धनवळे, बापू वाघ, अर्जुन वाघ, कैलास वाघ, सौरभ पवार, सचिन वरखड, राजु पवार, अंकुश मोरे, मिठू पवार, रेवन पवार, अशोक वरखड, सचिन म्हस्के, संकेत म्हस्के, राम म्हस्के, दत्तात्रय पवार, विलास पवार, प्रणव पवार, प्रमोद म्हस्के, अभी काळे, स्वप्नील तवले यांच्यासह शेकडो तरुण व कार्यकर्ते प्रचाराचा सहभागी झाले होते.
माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी मतदारसंघाबरोबरच वाघवाडी, जेऊर परिसरात विविध विकास कामे मार्गी लावली असल्याने मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य मतदार, तरुण, महिला, शेतकरी कर्डिले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत.
एकनाथ वाघ ( माजी ग्रामपंचायत सदस्य )
विरोधकांना पराभव दिसू लागल्याने कर्डिले यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केला जात आहे. खोटे नाटे आरोप करण्यात येत आहेत. परंतु मतदार राजाला सर्व माहिती असल्याने विरोधकांची कोणतीही खेळी यशस्वी होणार नाही. कर्डिले हेच आमदार होणार.
..... आप्पा बनकर ( सामाजिक कार्यकर्ते )
___________________________
Post a Comment