धनगर समाज पाचपुते यांच्या पाठीशी – बबनराव मदने



माय नगर वेब टीम 

श्रीगोंदा : आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबाकडून सर्व सामान्य कार्यकर्त्यांना नेहमीच सन्मानाची वागणूक मिळते पण नागवडे कुटुंबाकडून गोरगरीब जनतेला दांडक्याचा मार खावा लागत आहे त्यामुळे धनगर समाज हा आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीर उभा राहणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव मदने यांनी  समाजाच्या बैठकीत बोलताना केले व या निवडणुकीत विक्रम पाचपुते यांना पाठींबा दिला आहे .


पुढे बोलताना मदने म्हणाले धनगर समाज हा भटका समाज आहे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  आमदार बबनराव पाचपुते यांनी नेहमीच सन्मानाची वागणूक दिली व महत्वाची पदेही पाचपुते यांच्यामुळे मिळाली आहेत पण नागवडे कुटुंबाकडून महिलांना लहान मुलांना मारहाण करण्याच्या घटना घडल्या आहेत नागवडे यांनी आमच्या समाजाला कधीच सन्मानाची वागणूक दिली नाही असे शेवटी मदने म्हणाले .

यावेळी  कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब कोळपे  आदेश शेंडगे ,बबन श्रीराम  ,बाळाप्पा राहिंज ,डॉ नवनाथ कोल्हटकर ,बाबासाहेब चोरमले ,अमृत पांडूळे  आदी उपस्थित होते .

माझ्या नावाने चुकीच्या बातम्या प्रसिद्ध –  आबासाहेब कोल्हटकर

काही प्रसारमाध्यमात धनगर समाजाचा नागवडे यांना पाठींबा अश्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत व त्यात पाचपुते कुटुंबाविषयी चुकीचे वक्तव्य माझ्या तोंडी घातले आहे वास्तविक त्या बातम्यांचा व माझा काहीही संबध नाही अशी प्रतिकिया कारखान्याचे माजी संचालक आबासाहेब कोल्हटकर यांनी दिली

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post