माय नगर वेब टीम
मध्य प्रदेशमध्ये एका 16 वर्षाच्या मुलीवर तिच्या मामाच्या सांगण्यावरून त्याच्या जावयाने व एका मित्राने धावत्या अॅम्ब्युलन्समध्ये सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मामाच्या जावयाला व अॅम्ब्युलन्स चालक असलेल्या त्याच्या मित्राला अटक केली आहे. तर मामा व मामाची मुलगी हे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
22 नोव्हेंबर रोजी सदर मुलगी तिच्या मामे बहिणीसोबत अॅम्ब्युलन्समधून तिच्या सासरी जात होती. या अॅम्ब्युलन्समध्ये मुलीचा मामा, त्याची मुलगी, जावई असे सर्व प्रवास करत होते. मामा व जावई चालकासोबत पुढे बसलेले तर पीडित मुलगी व तिची मामे बहिण मागे बसलेले.
त्यांची अॅम्ब्युलन्स घाटावर आली असता मामे बहिणीने पाणी पिण्याच्या बहाण्याने गाडी थांबवली व ती पुढे निघून गेली. त्यानंतर बहिणीचा नवरा व चालक मागे आले व त्यांनी आळीपाळीने मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी मुलीला पुन्हा तिच्या घराजवळ नेऊन टाकले. सदर घटना कुटुंबातील वादामुळे झाल्याचे समजते.
Post a Comment