काचेच्या घरात राहुन दुसर्यांना दगड मारु नये
माय नगर वेब टीम
श्रीगोंदा - 2019 मध्ये व आताही राहुल जगतापांचे अनेक कारनामे पक्ष नेतृत्वाच्या कानावर गेल्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे बिथरलेल्या जगतापांनी पाचपुते यांना "टार्गेट" करायचे ठरवलेल दिसतय पण तेही काचेच्या घरात राहुन दुसर्यांना दगड मारायचा उद्योग बंद करावा अशा शब्दांत भाजप चे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी राहुल जगताप यांचा समाचार घेतला.
दोन दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवार जगताप यांनी पाचपुते यांच्यावर तोंडसुख घेतले होते त्यांना नागवडे यांनी शेलक्या भाषेत प्रत्युत्तर दिले आहे नागवडे म्हणाले जगतापांनी आपणच आघाडी चा उमेदवार असल्याचा डांगोरा पिटला होता पण कारखान्याचे कारनामे , कामगारांचे थकलेले पगार , शेतकऱ्यांचे थकलेली देणी या सर्व गोष्टी पवार साहेबाना मान्य नाहीत त्यामुळे त्यांनी दोनही वेळा जगताप ना तिकीट नाकारले . पण आपला गट ज्वलंत ठेवण्यासाठी पराभव दिसत असताना उमेदवारी केली आहे पण सांगण्यासारखे काहीच नसल्याने पाचपुते एके पाचपुते हा नाराच त्यांनी सुरू केला आहे. पण त्यांना अपघाताने 2014 मध्ये मिळालेल्या आमदारकीच्या काळात त्यांनी काय दिवे लावले हे जनतेला माहिती आहे . जगताप यांनी कोणते काम केले हे सांगावे मग त्यांनी पाचपुते वर टीका करावी . २०१९ला मैदान सोडुन का पळाले हे सांगावे. कुकडी कारखाना उभारणीत आमदार बबनराव पाचपुते यांचा आशिर्वाद असल्याचे जगताप विसरले किंवा त्यांना आठवत नसावे कारण कारखाना उभा राहताना ते वयाने लहान होते.
आमदार बबनराव पाचपुते यांनी केलेला विकास पाहण्यासाठी मतदारसंघात फिरावे लागते फक्त निवडणूक आली की यांना तालुका दिसतो असे शेवटी नागवडे म्हणाले.
भावनिकतेवर आमदार ठरत नसतो.
जगताप भाषणात जनतेला विचारतात माझी काय चुक? पण त्यांनीच सांगीतले पाहिजे २०१९ला मैदान का सोडले फक्त सोशल मीडियावर भावनिक वातावरण निर्माण करुन आमदार होता येत नाही
जगताप धुतल्या तांदळासारखे आहेत का?
जगताप दुसर्याच्या घराला दगड मारताना विसरतात आपणही काचेच्या घरात राहतोत. कारखाना कशामुळे कर्जबाजारी झाला हे सांगण्यऐवजी पाचपुते यांच्या वर टीका करुन पोरकटपणा सिध्द करतात. जगताप याच्यावरही कारखान्याच्या कामकाजावर अनेक गुन्हे आहेत मग ते गुन्हेगार आहेत का .
२०१४ते२०१९चा विकास फक्त दारू दुकाने
पाईपलाईन रोड ते गोवा
२०१४ते२०१९च्या काळात काय विकास झाला तर तो विकास म्हणजे नगरच्या पाईपलाईन रोड वरुन सुपा मार्गे गोवा असा झालेला दिसतोय..
Post a Comment