माय नगर वेब टीम
डर्बन – मार्को जॅनसेनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंकेला २३३ धावांनी पराभूत करताना पहिल्या कसोटी लढतीत विजय मिळविला. दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्या डावात १९१ धावा करताना दुसरा डाव ५ बाद ३६६ धावांवर घोषित केला होता.
श्रीलंका संघाचा पहिला डाव ४२ तर दुसरा डाव २८२ धावांवर संपुष्टात आला. मार्को जॅनसेनने पहिल्या डावात ७ तर दुसऱ्या डावात ४ गडी बाद करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
Post a Comment