अतितटीच्या लढतीत अखेर रोहित पवारांनी मारली बाजी, राम शिंदे पुन्हा पराभूत…

 


माय नगर वेब टीम 

Karjat-jamkhed Assembly Election 2024 Results : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी गेल्या महिन्याभरापासून सुरु आहे.  महाराष्ट्र राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल आज(23 नोव्हेंबर) जाहीर होत असून एकेका मतदारसंघाचा निकाल समोर येण्यासही सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत अनेक बिग फाईट्स पहायला मिळाल्या.

यातच कर्जत-जामखेड मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते कारण अहिल्यानगरच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांचे घोषणा होताच हा मतदारसंघ राज्यभर चर्चिला गेला. कारण या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व युवा नेतृत्व रोहित पवार (Rohit Pawar) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली होती. तर विरोधात रोहित पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे आणि 2019 ला पराभूत झालेले राम शिंदे (Ram Shinde) यांना भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यामुळे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात यावेळी काटे की टक्कर पाहायला मिळाली.

रोहित पवार विजयी…

अशा या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतितटीच्या लढतती रोहित पवार यांनी बाजी मारली आहे. रोहित पवार यांनी 1 हजार 243 मतांनी विजय मिळवला आहे. रोहित पवार यांना 1 लाख 27 हजार 676 तरे त्याचे विरोधक राम शिंदे यांना 1 लाख 26 हजार 433 मते मिळाली आहेत. त्यामुळे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत रोहित पवार यांनी विजय मिळवत पुन्हा एकदा राम शिंदेना पराभवाचा धक्का दिला आहे.

कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघ निकाल….

रोहित पवार : 1 लाख 27 हजार 676 मते (विजयी)

राम शिंदे : 1 लाख 26 हजार 433 मते

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post