“महाराष्ट्रात इतकं मोठं यश मी ..” निकालानंतरच्या अजित पवार स्पष्टच बोलले

 


माय नगर वेब टीम - 

Ajit Pawar on results ।  राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठे यश मिळाले. एकूण 288 मतदारसंघांपैकी 224 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जिंकण्याच्या मार्गावर आहेत. तर महाविकास आघाडीला अवघ्या 58 जागांवर जागांवर समाधान मानावे लागले आहे. हा पराभव मविआसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, महायुतीच्या या विजयानंतर तिन्ही पक्षांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे आभार मानले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील निकालावर प्रतिक्रिया देताना हा विजय अनाकलनीय असल्याचे म्हटले आहे.

पत्रकार परिषदेची सुरुवात करताना अजित पवार यांनी,”आपापल्या परिने प्रत्येकजण अंदाज व्यक्त करत होते. मात्र महाराष्ट्रातल्या जनतेने विकासाकडे पाहून जे यश प्राप्त करुन दिलं आहे. त्यामुळे मी मनापासून सगळ्या महाराष्ट्राचे आभार मानतो. कार्यकर्ते राबले, उमेदवार राबले आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली निवडणूक आहे असं समजून कामाला लागले. आमच्या योजनांबाबत चेष्टा मस्करी करण्यात आली. राज्य कंगाल केलं वगैरे सांगण्यात आलं. मात्र विरोधकांचे जाहीरनामे आल्यानंतर काय चाललं आहे ते आम्हाला समजलं. आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत अपयश आलं. त्यातून आम्ही सावरण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प सादर करताना योजना आणल्या. लाडकी बहीण योजना गेमचेंजरच ठरली. त्यामुळे सगळे विरोधक उताणे पडले. आता आमच्यावरची जबाबदारी वाढलीय असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना त्यांनी “मी जेव्हापासून राजकारणात आलो आहे, तेव्हापासून इतकं प्रचंड बहुमत मी पाहिलेलं नाही. २२२ आणि २२५ असं महाराष्ट्रात मिळालेलं यश मी पाहिलेलं नाही असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. अलिकडच्या काळात जसं आम्हाला समजतंय ते यश पहिल्यांदाच मिळालं आहे. खूप काही काम करावं लागेल असं मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना फोन करुन सांगितलं. आम्हाला त्यात कुठलीही अडचण नाही. आमच्या पाठिशी केंद्र सरकार आहे. त्यांचा आम्हाला खूप मोठा आधार आहे” असेही अजित पवार यांनी म्हटले.

त्यासोबतच विरोधकांचा समाचार घेताना अजित पवार यांनी,”विरोधक टीका करतात की बॅलेट पेपरने निवडणूक घ्यायला हवी होती. मग ती लोकसभेलाही घ्यायला हवी होती. तेव्हा ईव्हीएम बरोबर होतं का? झारखंड आमच्या हातून गेलं आहे आम्ही काही म्हटलं आहे का? महायुती महाराष्ट्रात जोर सगळ्याच ठिकाणी पाहण्यास मिळाल्या. असंही अजित पवार म्हणाले. सगळीकडे महाराष्ट्रात महायुतीला चांगलं यश मिळालं. जनतेच्या ऋणातच आम्ही राहू शकतो. पाच वर्षे अत्यंत एकोप्याने शेवटपर्यंत काम करेल आणि राज्याच्या सर्वांगिण विकासासाठीच काम करु. विकास हा केंद्रबिंदू मानून आम्ही करत आहोत, करत राहू मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच आमच्यावरची जबाबदारी आता वाढली आहे” असेही  त्यांनी यावेळी म्हटले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post