नव्या सरकारचं नेतृत्व कोण करणार? नव्या मुख्यमंत्र्यांचं नावही ठरलं आणि शपथविधीचा मुहूर्त ठरला

 


माय नगर वेब टीम 

Maharashtra CM Oath-Taking Event 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोल्समधून जाहीर झालेले अंदाज पाहून महायुती व मविआमध्ये अटीतटीची लढत होईल असं दिसत होतं. काही एक्झिट पोल्समधून त्रिशंकू स्थितीचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तीन चाचण्यांनी अंदाज वर्तवला होता की राज्यात मविआला बहुमत मिळेल. मात्र, सर्व राजकीय विश्लेषक, मतदानोत्तर चाचण्या चुकीच्या ठरवत महायुतीने तब्बल २३६ जागांवर आघाडी मिळवली आहे. रात्री १० वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार २८८ पैकी २३६ जागांवर महायुती आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर आघाडी मिळाली आहे. महायुतीमध्ये भाजपाला १३३, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (शरद पवार) १० जागा जिंकल्या आहेत.

राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमत दिल्यानंतर आता महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरपर्यंतच आहे. तत्पूर्वी नवं सरकार स्थापन करणं अपेक्षित आहे. २६ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन झालं नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. त्यामुळे महायुती २६ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करेल. भारतीय जनता पार्टी राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून राज्यपाल या पक्षाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करू शकतात. दरम्यान, अनेक वृत्तवाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत की मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नव्या सरकारचा शपथविधी होईल.

मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार?

भाजपाने तब्बल १३५ हून अधिक जागा जिंकल्यामुळे भाजपा नेते व विद्यमान उपमुखयमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढील पाच वर्षांसाठी राज्याचं नेतृत्त्व करू शकतात. मात्र देवेद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की आमच्या महायुतीतील सर्व पक्षांचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय घेतील.

दरम्यान, या शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातील जनतेने, तसेच विदर्भासह नागपूरच्या जनतेने आम्हाला प्रचंड आशीर्वाद दिला आहे. तसेच जे लोक सांगत होते की विदर्भात आमचं पानिपत होईल, आमचं विदर्भात किंवा नागपुरात पानिपत होईल त्यांचंच विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पानिपत झालं आहे. राज्याच्या जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे मी राज्याच्या जनतेसह नागपूर व विदर्भाच्या जनतेचे, माझ्या कर्मभूमीचे आभार मानतो. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की भाजपाला १३७ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता भाजपाचा, नागपूरचा मुख्यमंत्री होणार का? यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमच्या तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील. हा निकाल खरोखरंच अविश्वसनीय, अभूतपूर्व असा निकाल आहे. ईश्वर व जनता जेव्हा आपल्याला काहीतरी देते तेव्हा भरभरून देते. जनतेने आम्हाला छप्परफाड मतदान केलं आहे”.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post