महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार? एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार

 


माय नगर वेब टीम 

दिल्लीतील बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगलीय.. त्यातच शिंदेंनी मुंबईतील बैठका रद्द करून दरे गावी जाण्याचा निर्णय घेतलाय. मात्र आता शिंदे मोठा निर्णय घेण्याचे संकेत शिंदे गटाने दिलेत.. 

राज्यातील सत्तास्थापनेचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढतच चाललाय. त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपला मुक्काम सातारा जिल्ह्यातील दरे गावी हलवलाय. विशेष म्हणजे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यामुळे आणखीनच राज्याच्या राजकारणातली उत्सुकता वाढलीय.

कारण शिंदे जेव्हा जेव्हा त्यांच्या मूळ गावी जातात तेव्हा मोठा निर्णय़ घेतात असं शिरसाटांनी सांगितलंय. त्यामुळे आता एकनाथ शिंदे कोणता मोठा निर्णय घेतात याबाबत चर्चेला उधाण आलंय. तर त्यांच्या गावी जाण्याची ठाकरे गटानं खिल्ली उडवलीय.

राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकानाथ शिंदेंनी आपल्या दरे गावी जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यातच शिंदे गटाकडून एकनाथ शिंदेंच्या तब्बेतीचं कारण दिलं जातंय. शिंदेंना ताप आणि कणकण असल्याने ते दिवसभर कुणालाही भेटणार नसल्याचं सांगण्यात आलंय. दरे गावी जाऊन शिंदे कोणता निर्णय घेण्याची शक्यता आहे? पाहूयात.

यापूर्वीही एकनाथ शिंदे यांच्यापुढे राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी दरे गावी जाऊन निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता पुन्हा मुख्यमंत्री शिंदे दरे गावाहून पुन्हा माघारी परतल्यानंतर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार की दुसरा मोठा निर्णय घेणार याची राज्याला उत्सुकता आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post