महाविकास आघाडीवर मोठी नामुष्की, सत्ता सोडा विरोध पक्षनेतेपदही नशीबी नाही…

 


माय नगर वेब टीम 

मुंबई : विधानसभेत विरोधी पक्षनेते पद मिळावे एवढ्या जागा देखील महायुतीने महाविकास आघाडीला मिळाल्या नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीवर विरोधी पक्षनेत्याविनाच विधानसभेत बसण्याची नामुष्की ओढावली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे आतापर्यंत जे निकाल हाती आले आहेत त्यानुसार भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

भाजप 133 जागांवर आघाडीवर आहेत. तर शिवसेना 57 जागांच्या आघाडीसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस 41 जागांवर आघाडीवर असून तिसऱ्या स्थानावर आहे. अशारितीने महायुतीच्या तिन्ही पक्षांनी चमकदार कामगिरी केली आहे.

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी एखाद्या पक्षाला एकूण जागांपैकी 10 टक्के जागा मिळवणे आवश्यक असते. म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी किमान 29 जागा मिळवणे गरजेचं आहे. मात्र काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट कोणताही पक्ष 29 जागा जिंकण्याची शक्यता नाही. त्यामुळे कुणालाही विरोधी पक्षनेते पद मिळणार नाही.

शिवसेना ठाकरे गट 20 जागांच्या आघाडीसह चौथ्या, काँग्रेस 15 जागांच्या आघाडीसह पाचव्या आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागांच्या आघाडीसह सहाव्या  स्थानावर आहे. त्यामुळे यापैकी एकाही पक्षाला विरोधी पक्षनेते पद मिळणार नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post