माय नगर वेब टीम
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय झाला नाही. त्यातच आता राजकाऱणात नवा ट्विस्ट आलाय.. नेमकी महायुतीची ही नवी रणनीती काय आहे? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर आता भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाल्याची चर्चा रंगलीय. त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय.
आतापर्यंत तुम्ही पाहत असलेल्या ज्येष्ठ मंत्री आणि अनुभवी नेत्यांऐवजी महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात पन्नासच्या आतील सर्वाधिक आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात येणार असल्याची चर्चा रंगलीय.
त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात यंग ब्रिगेड दिसण्याची शक्यता आहे. मात्र या नव्या मंत्रिमंडळात कुणाला लॉटरी लागण्याची शक्यता आहे? पाहूयात....
तरुण आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी?
भाजपच्या या चेहऱ्यांना संधी?
गोपिचंद पडळकर
नितेश राणे
राहुल कुल
राष्ट्रवादी (AP) च्या या चेहऱ्यांना संधी?
संजय बनसोडे
संग्राम जगताप
आदिती तटकरे
शिंदे गटाच्या या चेहऱ्यांना संधी
आमशा पाडवी
योगेश कदम
अमोल खताळ
महाराष्ट्रातील नव्या महायुती सरकारचा संभाव्य फॉर्म्युला, भाजप एकनाथ शिंदेंचा मान रााखणार का?
विधानसभेच्या निकालात भाजपने 132, शिंदे गटाने 57 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागांवर विजय मिळवला. त्यानंतरही मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत तिढा होता. मात्र एकनाथ शिंदेंनी आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलंय. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील, तो मान्य असेल, अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतलीय. मात्र मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडल्यानंतर ज्येष्ठांना डावलून एकनाथ शिंदे आणि अजित पवार तरुणांना मंत्रिमंडळात संधी देण्यास राजी होणार का? आणि तरुणांना संधी दिल्यास ज्येष्ठ नेत्यांचं पुनर्वसन कसं करणार? याकडे लक्ष लागलंय...
Post a Comment