बच्चू कडूंना मोठा धक्का ! प्रहारच्या उमेदवाराने दिला मविआच्या ‘या’ उमेदवाराला जाहीर पाठींबा



माय नगर वेब टीम 

अमरावती : राज्यात सध्या विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. यादरम्यान अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अमरावतीमध्ये बच्चू कडूंना मोठा धक्का धक्का बसला आहे. परिवर्तन महाशक्तीचे अमरावती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ सय्यद अबरार यांनी चक्क महाविकास आघाडीच्या सुनील देशमुख यांना जाहीर पाठिंबा घोषित केला आहे.

प्रहारचे उमेदवार सय्यद अबरार यांनी दिला अचानक काँग्रेसचे उमेदवार सुनील देशमुख यांना पाठिंबा अचानक पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तृळात चर्चाना मोठे उधाण आले आहे. सय्यद अबरार यांनी पाठिंबा दिल्याने सुनील देशमुख यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. सय्यद अबरार यांच्या पाठींब्याचा आम्हाला फायदा होईल आणि मते सेक्युलर पार्टी म्हणून आमच्याकडे वळतील, असा विश्वास सुनील देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

सय्यद अबरार यांनी स्वखुशीने आम्हाला पाठींबा दिला आहे. काल ते मला भेटले आणि म्हणाले माझ्या लक्षात आले की मी निवडणुकीत उभे राहणे हे फोल आहे. काही मते मी घेईल पण त्यामुळे सेक्युलर पार्टीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे मी माझ्या जवळच्या लोकांशी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यामध्ये सर्वांचे एकमत झाले की, विनाकारण उभे राहण्यात काही तथ्य नाही. त्यामुळे तुम्ही महाविकासआघआडीच्या उमेदवाराला पाठींबा द्या. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणलेला नाही किंवा आमीष दिले नाही अशी प्रतिक्रिया सुनील देशमुख यांनी दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post