माय नगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी (MVA) यांना पाठिंबा देणाऱ्या विविध संघटनांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) या देशातील सर्वात मोठ्या मुस्लिम संघटनेने निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे.
AIMPLB चे सदस्य मौलाना सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीच्या २६९ उमेदवारांना समर्थन देत मुस्लिम समुदायाला आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच मराठा आणि इतर ओबीसी उमेदवारांसह २३ मुस्लिम उमेदवारांनाही समर्थन देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे महाविकास आघाडीला मोठा राजकीय फायदा होण्याची शक्यता आहे.
AIMPLB च्या या निर्णयानंतर भाजपने महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपने काँग्रेसवर दुहेरी भूमिकेचा आरोप करत म्हटले की, काँग्रेस ‘बंटेंगे तो कटेंगे’ सारख्या घोषणा देऊन द्वेषाच्या राजकारणाला विरोध करते, परंतु मुस्लिम संघटनांकडून मिळणाऱ्या अशा पाठिंब्याला मात्र विरोध करत नाही.
याआधी उलेमा बोर्डानेही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता, त्यामुळे AIMPLB च्या या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. अशा वेळी AIMPLB च्या पाठिंब्यामुळे मुस्लिम मतदार आघाडीच्या बाजूने एकत्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Post a Comment