माय नगर वेब टीम
Maharashtra New CM Oath Ceremony : राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ठरला आहे. मुंबईतील आझाद मैदानमध्ये 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
बावनकुळे यांचे ट्विट –
राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी. विश्वगौरव माननीय पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी
विश्वगौरव माननीय पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
भाजपकडेच मुख्यमंत्रिपद?
राज्यात सर्वाधिक जागा निवडून आलेल्या भाजपकडेच मुख्यमंत्रिपद जाणार हे आता निश्चित झाले आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. भाजपमधून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव अंतिम झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात 2 डिसेंबर रोजी भाजपची बैठक असून त्यामध्ये गटनेता निवडला जाणार आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपद आणि नगरविकासमंत्रिपदासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. पण गृहमंत्रिपद हे शिंदेंना द्यायला भाजपने नकार कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली –
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारपासून साताऱ्यातील त्यांच्या मूळ गावी दरे गावात मुक्कामी आहेत. तब्येत बरी नसल्याने शिंदेंना आराम करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिल्याची माहिती आहे. ताप आणि कणकणी असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली.
Post a Comment