‘ईव्हीएम हॅक होत असल्‍याचे सिद्ध करून दाखवावे’; रावसाहेब दानवे यांचे थेट आव्‍हान



माय नगर वेब टीम 

आम्ही हिमाचलमध्ये निवडणूक हरलो, तेव्हा कोणीही ईव्हीएमवर आक्षेप घेतला नाही. ईव्हीएम हॅक करता येत, असेल तर जाहीररित्या हॅक करून दाखवा. जेव्हा जनता त्यांना नाकारते आणि आमच्या बाजूने जनादेश देते, तेव्हा विरोधक आक्षेप घेतात, असा हल्‍लाबोल करत भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेत दानवे यांनी विरोधकांना थेट आव्‍हान दिले आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी ईव्हीएमबाबत खळबळजनक दावा केला होता. या विधानावर रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

रावसाहेब दानवे म्‍हणाले, महादेव जानकर माझे मित्र चांगले आहेत. महादेव जानकर किंवा इतर कोणी मोठे इंजिनिअर असतील, तर त्यांनी ईव्हीएम हॅक होते, हे सिद्ध करून दाखवावे, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

तसेच सरकार स्‍थापनेबाबत रावसाहेब दानवे म्हणाले, जेव्हा तीन पक्षांच सरकार बनतं, तेव्हा समन्वय असणे आवश्यक असते. तो समन्वय आमच्यात आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.

आमच्या पक्षात याबाबत कुठलाही वाद नाही. आमचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असणार आहे. शपथविधीबाबत निश्चित तारीख अद्याप पक्ष श्रेष्ठींनी आम्हाला कळवली नाही. तसेच खाते वाटप, नेता निवडीवरून आमच्यात कोणतेही वाद नाहीत, असेही त्‍यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post