आमदार संग्राम जगताप यांचा विजय निश्चित : कोण म्हणाले पहा...

 


माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर - शहरातील तृतीय पंथी समाजासाठी स्मशानभूमीचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होता.यासाठी गेल्या २५ वर्षांपासून माही पाठपुरावा करत होतो. मात्र न्याय मिळाला नाही. पण आ. संग्राम जगताप यांनी एका मागणीत स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शहरातील तृतीय पंथ्यांच्या स्मशानभूमीचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यांनी यासाठी केवळ सात दिवसात अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पुढील काळात तृतीय पंथ्यांसाठी घरकुल योजना ही राबवण्यात येण्याचे आश्वासन आमदार जगताप यांनी दिले आहे. सर्व समाजांना सहकार्य करणारे व सर्वांचे प्रश्न सोडवणारे आमदार जगताप सर्वसामान्य नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध असणारे आमदार जगताप यांचा विजय निश्चित असून भविष्यात ते मंत्रीही होतील, असे आशीर्वाद तृतीय पंथी समाजाचे जिल्हाध्यक्ष काजल गुरु यांनी यांनी आमदार जगताप यांना देऊन सर्व लाडक्या बहिणींप्रमाणे तृतीयपंथी बहिणींनाही लाडकी बहीण योजना सुरू करावी यासाठी आमदार जगताप यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करावा, अशी मागणी काजल गुरु यांनी केली. 

        महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी प्रचारार्थ बुधवारी सायंकाळी प्रभाग क्रमांक चार तारकपूर, प्रकाशपुर परिसरात फेरी काढण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, अमोल गाडे, ठाकूर नवलानी, जितू गंभीर, जयकुमार रंगलानी, जनक अहुजा, लकी खूपचंदाणी, कैलास नवलानी, बल्लू सचदेव, जितू सदवाणी, सुरेश हिरानंदानी, चिंटू गंभीर, रॉबिन साळवे, भाजपाचे नेते दामोदर बठेजा, हॅपी कुकरेजा, हरजितसिंग वधवा आदींसह परिसरातील सिंधी, पंजाबी व शीख समाजचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

         यावेळी हरजीतसिंग वधवा म्हणाले, नगर शहराच्या जडणघडणीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जगताप कुटुंबीय महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.  नगरमध्ये आमदार जगताप यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहे. यामध्ये आयटी पार्क पुनर्जीवित करणे, नगरच्या नव्या एमआयडीसीसाठी सहाशे एकरची जागा उपलब्ध करून देणे, तारकपूर भागात सर्व अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाली आहेत. शहरातील अल्पसंख्यांक सिंधी पंजाबी समाजाचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत.  त्यामुळे शहरातील पंजाबी सिंधी समाज कायम त्यांच्या पाठीशी उभे आहे.  

       यावेळी अमोल गाडे यांनी आ.सांगणारं जगताप यांच्या प्रयत्नातून प्रभाग चार मध्ये झालेल्या विकास कामासानही माहिती दिली. प्रभाग चार मध्ये ६० कोटींची विकास कामे झाली आहेत. प्रभागातील सर्व अंतर्गत रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. सिंधी समाजाच्या सांस्कृतिक भावनासाठी आ.जगताप यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे.  त्यामुळे या भागातील नागरिक आ.संग्राम जगताप यांच्या पाठीशी उभे आहेत.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post