माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - शासनाकडून गरीब कुटूंबासाठी घरकुल उभारणीसाठी देण्यात येणारा निधी अतिशय तुटपुंजा असून शासनाने एका घरकुलासाठी किमान चार लाख रूपये निधी देण्याची आग्रही मागणी खा. नीलेश लंके यांनी संसदेच्या सभागृहात केली.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त खा. नीलेश लंके हे नवी दिल्लीमध्ये असून अधिवेशनात सहभागी होत त्यांनी घरकुलांच्या प्रश्नावर सभागृहाचे लक्ष वेधले.
खा. लंके म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये काही महत्वाचे बदल आवष्यक आहेत.अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे, परंतू घरकुलांची संख्या अत्यंत कमी आहे. महागाईचा विचार करता ग्रामीण व शहरी भागातील घरकुलांसाठी देण्यात येणारा निधी फारच तुटपुंजा आहे. घरकुलासाठी १ लाख २० हजार घरकुलासाठी, शौचालयासाठी १२ हजार रूपये, २६ ते २८ हजार मनरेगामधून असा एका घरकुलासाठी १ लाख ५८ हजार ते १ लाख ६० हजार दिले जातात.
माझी मागणी आहे की कमीत कमी एका घरकुलासाठी चार लाख रूपये मिळणे अपेक्षीत आहे. घरकुलासाठी ग्रामीण भागात जागा उपलब्ध होत नाही. जागा उपलब्ध झालीच तर त्या जागेचा उतारा मिळत नाही. त्यात सुधारणा करून माझ्या सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त घरकुले मिळावीत अशी अपेक्षा खा. लंके यांनी सभागृहात केली.
Post a Comment