माय नगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेले त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा दारुण पराभव झाला आहे. माहीम मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा या विभागात विजय झाला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांचं जन्मस्थळ हे माहीम आहे. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात यावेळेस दोन पक्ष समोरासमोर उभे होते. यामध्ये शिवसेना विरूद्ध शिवसेना असतानात मनसेने अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे माहीममध्ये तिरंगी लढत पाहायाला मिळाली. विशेष म्हणजे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
माहीममधून अमित ठाकरे यांच्या विरोधात महायुतीतून देखील उमेदवार उभा होता. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली होती.
अमित ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर होण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. यामध्ये भाजपच्या नेत्यांनी सदा सरवणकर यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी विनंती केली, मात्र सरवणकर आपल्या निवडणूक लढण्याच्या मतावर ठाम होते.
सरवणकरांचाही पराभव
विद्यमान आमदार सदा सरवणकरांनाही जनतेने नाकारल्याचं दिसून आलं. पक्षफुटीनंतर ठाकरेंची साथ न देणं, किंवा गेल्यावर्षी प्रभादेवीत गणपतीच्या मिरवणुकीत झालेला गोळीबार असो या प्रकरणांमुळे सरवणकर यांचा पराभव झाल्याचं म्हटलं जातंय.
Post a Comment