‘काय झाडी, काय डोंगार’ म्हणणाऱ्या शहाजीबापू पाटलांचा पराभव; किती मते पडली पहा...

 


माय नगर वेब टीम 

Shahaji Patil Sangola Assembly Result | राज्यात महायुतीला मोठे यश मिळाले आहे. यानिमित्त महायुतीच्या नेत्यांकडून जल्लोष केला जात आहे. मात्र सांगोला विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांचा पराभव झाला आहे. शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले व काय झाडी, काय डोंगार या वक्तव्याने प्रसिद्ध झालेले शहाजीबापू पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख २५,३८४ मताने विजयी झाले आहेत.

शिवेसना एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांना पुन्हा उमेदवारी सांगोला विधानसभा मतदारसंघात पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दीपक साळुंखे आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबासाहेब देशमुख रिंगणात उतरले होते. अखेर येथून शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा विजय झाला आहे.

माजी आमदार साळुंखे पाटील यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष (अजित पवार गट) पदाचा राजीनामा देत थेट शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश करत उमेदवारी मिळवून त्यांनी शेकाप व शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजी पाटील यांना धक्का दिला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे अॅड. शहाजिबापू राजाराम पाटील 99,464 मते मिळवून विजयी झाले. यात भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख यांचे विजयाचे अंतर केवळ 768 मतांचे होते.

बाबासाहेब देशमुख – १,१६,२८०


शहाजीबापू पाटील – ९०,८९६


दीपकआबा साळुंखे – ५१,०००


शेकापचे डॉ.बाबासाहेब देशमुख २५ हजार ३८४ मतांनी विजयी.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post