माय नगर वेब टीम
Shraddha and Arjun Kapoor | मुंबईत 29 नोव्हेंबरला झालेल्या एका कार्यक्रमात अनेक स्टार्स सहभागी झाले होते. श्रद्धा कपूर, वरुण धवन, कार्तिक आर्यन, अर्जुन कपूर या सारखे सेलिब्रिटी या कार्यक्रमात हटके लुकमध्ये पाहायला मिळाले. यानिमित्त अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर रेड कार्पेटवर एकत्र पाहायला मिळाले.
‘जीक्यू मेन ऑफ द इयर’ अवॉर्ड सोहळ्यासाठी श्रद्धा कपूर अतिशय स्टायलिश अवतारात दिसली. काळ्या रंगाच्या मिनी ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. स्मोकी आय मेकअप, मोकळे केस आणि पांढरे बूट यामध्ये श्रद्धा दिसली. तर अर्जुन कपूर ब्लॅक आऊटफिटमध्ये आला होता. रेड कार्पेटवर श्रद्धा पापाराझींसमोर पोज देत होती. तेवढ्यात अर्जुन कपूर आला आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली. काही वेळ त्यांच्यात गप्पाही झाल्या.
दोघांना एकत्र पहिल्यानंतर अनेकांना ‘हाफ गर्लफ्रेंड’ सिनेमाची आठवण झाली. 2017 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील अर्जुन-श्रद्धाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा नव्या चित्रपटात दोघांना पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. दरम्यान, अर्जुनने नुकताच ‘सिंघम अगेन’ चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. तर श्रद्धाने ‘स्त्री २’ हा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला.
Post a Comment