देसवडे, मांडवे खु., वडगाव सावताळ, वासुंदे येथे प्रचार बैठका
माय नगर वेब टीम
पारनेर - मला अजित दादांचा शब्द खरा करायचा आहे अजितदादांनी माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली आहे. माझी जबाबदारी ही तुमची जबाबदारी आहे की नाही ते तुम्ही सांगा माझे सहकारी मला म्हणतात की आपल्यावर अन्याय झाला मग आपल्याला न्याय कोणी दिला ते तुम्ही सांगा मला जे सांगतात आम्ही भाकरी फिरवतो फिरवली का भाकरी त्यांनी एकाच कुटुंबात दोन भाकरी देऊन टाकल्या असे थेट मत सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केले. वासुंदे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार काशिनाथ दाते सर यांच्या प्रचारार्थ प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी झावरे बोलत होते.
यावेळी सुजित झावरे पाटील पुढे म्हणाले पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात आपल्याला राष्ट्रवादीचा आमदार करायचा असून काशिनाथ दाते सर हे उमेदवार नसून मीच उमेदवार आहे ते समजून तुम्ही सर्वांनी घड्याळाला मतदान करा असे आवाहन वासुंदे येथील बैठकीत सुजित झावरे पाटील यांनी केले आपल्याला अजितदादांचा शब्द खरा करायचा आहे. अजित दादांनी राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द दिला आहे. असे ही झावरे यावेळी म्हणाले..
पारनेर नगर विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे प्रचार सभांचा जोर वाढला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार काशिनाथ दाते सर यांच्या प्रचारा दरम्यान सुजित झावरे पाटील यांचा नेतृत्वाखाली देसवडे, मांडवे खुर्द, वडगाव सावताळ, वासुंदे बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उमेदवार काशिनाथ दाते, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, भाजपा तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, माजी जि प सदस्य वसंत खेडे माजी सभापती गणेश शेळके, माजी सभापती अरुण ठाणगे, सरपंच मनोज मुंगसे, सरपंच विमल झावरे, उपसरपंच शंकर बर्वे, चेअरमन नारायण झावरे, कासारे सरपंच शिवाजी निमसे, सामाजिक कार्यकर्ते वसंतराव दातीर, शरद पाटील, जालिंदर वाबळे, शिवाजी रोकडे आदी. यावेळी उपस्थित होते.
स्व. माजी आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या सोबत मी पंचवीस वर्ष एकत्र काम केले आहे. परंतु काही तात्विक कारणामुळे मी मध्यंतरी अलिप्त झालो होतो आमच्यात मतभेद झाले होते परंतु जे झाले ते झाले. ही २०२४ ची विधानसभेचे राष्ट्रवादीचे तिकीट हे मला सुजित झावरे पाटील यांनी दाखवलेल्या मोठेपणामुळे मिळाले असून त्यांनीच माझी शिफारस केली आहे. त्यामुळे वासुंदेकरांनी एकतर्फी मतदान करा.
काशिनाथ दाते - (राष्ट्रवादी उमेदवार पारनेर विधानसभा)
Post a Comment