इंडिया आघाडीच्या आंदोलनात खा. लंके यांचा सहभाग

 


संतोष देशमुख हत्या, बांगलादेशातील अत्याचाराविरोधात आंदोलन 

माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर :   बीड जिल्हयातील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची अमानुष हत्या तसेच बांगलादेशातील हिंदू व ख्रिश्चन बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या कामकाजास सुरूवात होण्यापूव संसदेसमोर आंदोलन केले. नगरचे खासदार नीलेश लंके हे या आंदोलनात सहभागी झाले होते. 

     हत्येचा आरोप असलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करा, खुनाचे कारण असलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपींना हत्येच्या गुन्हयात आरोपी करा, आरोपींना अटक करून खटला अंडर ट्रायल चालवा,  अशा प्रकारच्या खंडणी, अपहरण, छळ, खुनाच्या सर्व गुन्हयांचा तपास केंद्रीय गुप्तचर विभागाकडून करण्यात यावा, बीड जिल्हयामध्ये कायद्याचे राज्य स्थापन करा अशा मागण्या यावेळी इंडिया आघाडीच्या खासदारांकडून करण्यात आल्या. 

      बांगलादेशात हिंदू आणि ख्रिश्चनांवर होणाऱ्या अत्याचारावर केंद्र सरकार बोलत नाही म्हणून खासदारांनी हातात बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चनांच्या पाठीशी उभे रहा असे लिहिलेल्या बॅग हाती घेत आंदोलन केले. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधीही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post