मालपाणीज् बेकलाईट ने आत्तापर्यंत २५ कोटी क्रीमरोल्स बनवून गाठला ऐतिहासिक टप्पा



 माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर : खाद्यप्रक्रिया आणि बेकरी क्षेत्रातील अग्रगण्य व विश्वासपूर्ण ब्रँड असलेल्या मालपाणीज् बेकलाईट ने एक ऐतिहासिक टप्पा गाठला असून कंपनीच्या १९९९ स्थापना झाल्यापासुन २५ कोटी क्रिमरोल चे उत्पादन करून वेगाने वाटचाल करत आहे. बेकरी उद्योगक्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या पुण्यातील बेकलाईट फूड़ प्रोसेसिंग प्रा. लिमिटेड कंपनी ने बाजारपेठेत दोन दशकांपासून अधिक काळ कार्यरत आहे. ती ग्राहकांना पूर्णपणे शुद्ध शाकाहारी बेकरी उत्पादने पुरवते. 

बेकरी क्षेत्रात १०० टक्के शुद्ध शाकाहारी उत्पादने उपलब्ध करून देण्याचे ध्येय घेऊन श्री. सचिन मालपाणी यांनी बेकरी व्यवसायात प्रवेश केला. अगदी आजही बेकरी उद्योग असंघटीत असून क्रिम रोल्स, खारी, टोस्ट, जीरा बटर अशी अनेक उत्पादने स्थानिक उत्पादक विकत आहेत.

मात्र, या परिसराच्या अस्ताव्यस्त स्वरूपासोबतच स्वच्छतेचा अभाव, गुणवत्ता नियंत्रणाचा अभाव अशी समस्याही निर्माण झाली आहे. हे क्षेत्र प्रामुख्याने अंडी आणि मांसाहारी उत्पादने तसेच इतर बेकरी उत्पादनांची विक्री करणाऱ्या बेकरीद्वारे नियंत्रित केले जाते. यामुळे, शाकाहारी लोकांसाठी बेकरी उत्पादने खरेदी करण्याचे पर्याय खूपच मर्यादित झाले आहेत.

या यशाबद्दल मत व्‍यक्‍त करत मालपाणीज् बेकलाईटचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री.सचिन मालपाणी म्‍हणाले, क्रीम रोल फक्‍त डेझर्ट नसून आधुनिक विश्‍वातील समाधानाचे प्रतीक देखील आहे. शुध्द शाकाहारी उत्पादने लक्षात घेऊन आधुनिकता आणि परंपरेचा अनोखा मिलाफ असलेली उत्पादने भविष्यात बाजारात आणण्याची बेकेलाइटची योजना आहे. क्रीम रोल अद्वितीय स्‍वाद देण्‍यासोबत प्रसन्‍नतेचा अनुभव देतो आणि आपले मूळ व प्रियजनांशी असलेल्‍या संबंधाची आठवण करून देतो. अलिकडील काळात, क्रीम रोल्सकरिता आरोग्‍यदायी पर्यायांची मागणी वाढत आहे. 

मालपाणी पुढे म्हणाले की बेकलाइटचे शुद्ध शाकाहारी तत्त्व लक्षात घेत भविष्‍यात आधुनिकता व परंपरेचे अद्वितीय एकत्रिकरण असलेली उत्‍पादने लाँच करण्‍याची योजना आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post