हिंदू धर्मकार्य, गो रक्षणाबद्दल आ. संग्राम जगताप यांचे मोठे विधान, नेमकं काय म्हणाले पहा...

 


 गो मातेच्या जयजयकारात जय आनंद फाउंडेशनच्या वतीने आ.जगताप यांचा ‘गो रक्षक आमदार’ उपाधीने सत्कार

माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वांच्या मतरुपी आशीर्वादाने मला तिसऱ्यांदा विजय संपादन करता आला आहे. माझ्या विजयाने नगरकरांच्या खूप मोठ्या अपेक्षा वाढल्या आहेत. जनतेच्या सर्व अपेक्षा शहर विकासाच्या माध्यमातून पूर्ण करणार आहेच. यासाठी सर्वांना एकत्रितपणे बरोबर घेत शहराच्या विकाससाठी काम करून हिंदू धर्मकार्य व गो रक्षणासाठीही काम करणार आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.


            शहरात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या जय आनंद फाउंडेशनच्या वतीने आ.संग्राम जगताप यांनी गो रक्षणासाठी घेतलेल्या पुढाकारा बद्दल आनंदधाम जवळील अहिंसा चौकातील गो वास्त्सल्य शिल्पा जवळ त्यांचा सत्कार करून ‘गो रक्षक आमदार’ ही उपाधी दिली. यावेळी सत्कारास उत्तर देताना आ.जगताप बोलत होते. यावेळी जय आनंद फाउंडेशनचे संस्थापक कमलेश भंडारी, अध्यक्ष अमित काबरा, माजी नगरसेवक विपुल शेटीया,प्रकाश भागानगरे, सीए. किरण भंडारी, रितेश पारख, गौरव बोरा आदींसह जय आनंद फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी हिंदू धर्माच्या व गो मातेच्या जयजयकाराच्या घोषणा उपस्थितांनी दिल्या.


आ,जगताप पुढे म्हणाले, नगर शहर ही साधू संतांची भूमी आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराजांनी अहिंसा परमो धर्माची शिकवण आपल्याला दिली आहे. त्यांच्या समाधी जवळील या चौकाचे  जय आनंद फाउंडेशने अहिंसा चौक नामकरण करून गो वास्त्सल्याचे सुरेख शिल्प येथे उभारून महाराजांचा संदेश प्रत्यक्षात आणला आहे. हा चौक व शिल्प गो संवार्धांसाठी प्रेरक ठरत आहे. आता गो मातेच्या रक्षणाची वेळ आली आहे. महायुतीच्या सरकारने देशी गायींना राज्य मातेचा दर्जा दिला आहे. भविष्यात नगर जिल्हा गो हत्या मुक्त करण्यासाठी जास्तीत जास्त गोमातेचे रक्षण करण्यासाठी सर्वांबरोबर माझाही पुढाकार असणार आहे. गोरक्षकांच्या मागेही खंबीरपणे उभे राहून त्यांना सहकार्य करणार आहे.


            प्रास्ताविकात कमलेश भंडारी म्हणाले, आ.संग्राम जगताप यांच्या विजयी हॅटट्रिकने नगरकरांच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यास आ.जगताप सक्षम आहेतच. आता त्यांनी गो रक्षणासाठी ही पुढाकार घेत जिल्हा गो हत्या मुक्त करण्याची भूमिका घेतली आहे. हे आमच्यासाठी खूप आनंदायी आहे. त्यामुळेच त्यांना अहिंसा चौकात ‘गो रक्षक आमदार’ ही उपाधी देत त्यांचा सन्मान करून त्यांच्या या कार्यात सहभागी होणार आहोत. गोमातेच्या आशीर्वादाने त्यांना हुलकावणी दिलेले मंत्रिपदही लवकरच मिळेल, अशी मला खात्री आहे.


            यावेळी सुमीत लोढा, कुणाल बडजाते, गौतम मुथा,  नीलेश पोखरणा, सुनील गुगळे, सुभाष कर्नावट, अतुल शिंगवी, राहुल सोनीमंडलेचा, मनीष फूलडहाळे, अतुल कावळे आदींसह जय आनंद फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post