महिने ६, रूग्ण २६, मदत ६१ लाख!; पंतप्रधान फंडातून खा. नीलेश लंके यांच्या माध्यमातून मोठी मदत



राज्यापाठोपाठ केंद्रातही खा. लंकेंची दमदार कामगिरी 

माय नगर वेब टीम 

पारनेर :  मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून राज्यातील २८८ आमदारांमध्ये सर्वाधिक मदत मिळवून देण्याचा बहुमान प्राप्त केलेल्या खासदार नीलेश लंके यांनी संसदेत जाऊन सहा महिन्यातच राज्याप्रमाणेच दमदार कामगिरी केली आहे. ६ महिन्यात २६ रूग्णांना त्यांनी ६१ लाख २२ हजार ५०० रूपयांची मदत विविध रूग्णांना खा. नीलेश लंके यांच्या शिफारशीवरून प्रंतप्रधान सहाय्यता निधीतून करण्यात आली आहे. 

     विविध आजारांमुळे त्रस्त असलेल्या रूग्णांना मदत करण्याचा पिंड खा. नीलेश लंके यांचा आहे. त्यांचे नीलेश लंके प्रतिष्ठान किंवा विविध धर्मदाय रूग्णालयांमधून ते गरजू रूग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात गेल्या अनेक वर्षांपासून उपचार मिळवून देत आहेत. विधानसभेत गेल्यानंतर त्यांनी विशेषतः मुख्यमंत्री सहायता निधीचा मोठया खुबिने वापर करून घेत राज्यात सर्वाधिक रूग्णांना या फंडातून मदत मिळवून दिली. या कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनीच त्याची माहीती अधिकृतपणे यापूवच जाहिर केलेली आहे. 

स्वतंत्र कक्ष 

उपचारासाठी मतदारसंघातीलच नव्हे तर राज्याच्या कोणत्याही भागातील रूग्ण किंवा त्याचा नातेवाईक आल्यास त्यांना मदत करण्याची खा. लंके यांची भुमिका असते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या कार्यालयात वैद्यकिय कक्षाची स्थापना केली असून सबंधित रूग्णाचा प्रस्ताव पाठविण्यात आल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्याचे काम हा कक्ष करतो. राज्यपातळीवरील काही तज्ञही या कक्षाला मदत करतात.

आरोग्य शिबिराचे आयोजन 

मतदारसंघात लवकरच आरोग्य शिबिर तसेच नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्याची घोषणा खा. नीलेश लंके यांनी नुकतीच केली आहे. या शिबिरात रूग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. नेत्र तपासणीच्या माध्यमातूनही डोळयांसदर्भातील तक्रारी दुर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

कोरोना संकटातील रूग्णसेवेचा अनुभव 

कोरोना महामारीमध्ये जगामध्ये हाहाकार माजल्यानंतर खा. नीलेश लंके यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत दोन्ही लाटांमध्ये मोठया धाडसाने कोरोना बाधितांना मदतीचा हात दिला. घाबरलेल्या रूग्णांना आधार देत दिलासा दिला. कोरोनाच्या दोन्ही लाटांमधील केलेल्या रूग्णसेवेचा, रूग्णांना होणाऱ्या यातनांचा तसेच त्यांना आधार दिल्यानंतर त्यांच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचा अनुभव लंके यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे कोरोना संकटानंतर आरोग्यासाठीच्या मदतीसाठी खा. लंके हे अधिक सजग झाले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post