सुप्यात लंके समर्थकांची चिंतन बैठक / महिनाभरात गुड न्युज देणार !
माय नगर वेब टीम
सुपा : लोकसभा निवडणूकीत पराभव केला म्हणून मा. खा. डॉ. सुजय विखे यांनी ईव्हिएम मशिनच्या माध्यमातून माझ्याविरोधात ट्रॅप लावल्याचा आरोप खा. नीलेश लंके यांनी केला. दरम्यान, महिनाभरात गुड न्युज देतो असे सांगत खा. लंके यांनी आगामी राजकारणातील सस्पेन्स कायम ठेवला.
लोकसभा निवडणूकीतील धक्कादायक पराभवानंतर खा. नीलेश लंके समर्थकांचा सुप्यात मेळावा पार पडला. या मेळाव्यात खा. लंके यांनी आक्रमकपणे भूमिका मांडत विरोधकांवर शरसंधान सोडतानाच समर्थकांचेही कान टोचले.
यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, या निवडणूकीत यांत्रिकीरणाने घात केला आहे. कोणी काही म्हणत असेल तर मी आमदार नाही तर आज जिल्हयाचा खासदार आहे. प्रस्थापित व घराणेशाही विरोधात माझा उदय झाला आहे. त्यामुळे संघर्ष मला नवा नाही. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे सांगत समर्थकांचे कान टोचताना विधानसभा निवडणूकीत सतर्क राहिले असते तर आपल्या वाटयाला हा पराभव आला नसता, एकमेकांमधील जिरवाजिरवीचे राजकारण आता बंद करा असा सल्लाही खा. लंके यांनी दिला.
यावेळी माधवराव लामखडे, बाळासाहेब हराळ, माणिकराव भोसले, खंडू भुकन, बाबासाहेब तरटे, दिपक लंके, योगिराज गाडे, सुदाम पवार, अजय लामखडे, राजेंद्र चौधरी, शिवाजी व्यवहारे, नितीन अडसूळ, मारूती रेपाळे, डॉ. बाळासाहेब कावरे, ॲड. राहूल झावरे, भाऊसाहेब काळे, राजेंद्र शिंदे, गंगाराम बेलकर, दादा शिंदे, भागुजीदादा झावरे, शिवाजी जाधव, विश्वास जाधव, उत्तम साळुंके, सुवर्णा धाडगे, वसंत ठोकळ, सतीश पालवे, किसन सुपेकर, शकुंतला लंके, ऐश्वर्या ढोरजकर, वंदना गंधाक्ते, डॉ. विद्या कावरे, राजेश्वरी कोठावळे, वंदाना ठुबे, सायली चेडे, अशोक घुले, ठकराम लंके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
जाती पातीचे राजकारण योग्य नाही
यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, निवडणूक ही बंदूकीची गोळी असते. एकदा सुटली की सुटली. राजकारणात आज जाती धर्माचा रंग दिला जात असून एक दिवस भारताचा श्रीलंका झाल्याशिवाय राहणार नाही. देश एकसंघ राहण्यासाठी जाती-पातींचे राजकारण योग्य नसल्याचे लंके म्हणाले.
नीलेश लंके खचणारा नाही !
विधानसभा निवडणूकीत काठावर पराभव झाला हा निश्चितच चिंतनाचा भागा आहे. तुम्ही आत्मचिंतन करा. आजचा व येणारा काळही आपलाच आहे. नीलेश लंके हा उगवता सुर्य आहे, तो खचत नाही. चुक झाली ती झाली आता आरोग्य शिबिराचे आयोजन करून पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरूवात करू या. आपण आपल्या कामाच्या जोरावर राज्यात ओळख निर्माण केली आहे. विधानसभेत पराभव झाला म्हणून आपले राजकारण संपलेले नाही. चुकांच्या दुरूस्त्या करा. समाजाला दोष देऊ नका असा सल्ला खा. नीलेश लंके यांनी दिला.
Post a Comment