यशश्री प्री स्कूलच्या चार शिक्षीका 'द फाउंडेशन बिल्डर ॲवॉर्ड' ने सन्मानित

 माय अहिल्यानगर वेब टीम 

नगर तालुका : समाजाचा सर्वांगीण विकास साधून राष्ट्र निर्माणात योगदान देणारी पिढी घडविण्याचे काम शिक्षक, शिक्षण संस्था चालक करत असतात. पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचा चित्रकूट गुरुकुलच्या वतीने 'द फाउंडेशन बिल्डर ॲवॉर्ड' ने सन्मान करण्यात आला.

     जेऊर येथील यशश्री प्री स्कूलच्या चार शिक्षीकांचा 'द फाउंडेशन बिल्डर ॲवॉर्ड' ने सन्मान करण्यात आल्याने परिसरातील  नागरिकांकडून यशश्री स्कूल व सन्मानित शिक्षीकांचे कौतुक करण्यात येत आहे. चित्रकूट गुरुकुलच्या प्राचार्या सारिका आनंद चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलचे संचालक संजय चव्हाण, अशोक सचदेव यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान सोहळा नूकताच संपन्न झाला. नगर परिसरातील विविध शाळांचे प्राचार्य, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       जेऊर येथील यशश्री प्री स्कूलच्या प्राचार्या सौ. मनीषा पवार व मार्गदर्शक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या शिक्षिका वेदिका मगर, नलिनी खंडागळे, पुजा पवार, अंजली धनवळे या शिक्षीकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. चिमुकल्या विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण व सर्व गुण संपन्न घडविण्यासाठी यशश्री स्कूलच्या वतीने नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असतात. त्यामध्ये प्राचार्या मनीषा पवार व शिक्षीकांचा मोठा सहभाग असतो. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

_____________________

यशश्री प्री स्कूल जेऊरने शिक्षण क्षेत्रात आपला आगळा वेगळा ठसा निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांना सर्व गुणसंपन्न घडविण्यासाठी विविध नवनवीन उपक्रम राबविले जातात. संस्कृतीचे जतन व एकोपा शाळेत पहावयास मिळतो. यशश्री स्कूलने आपल्या कार्यकर्तृत्वातून नावलौकिक मिळवला आहे. त्यांच्या शिक्षीकांचा झालेला सन्मान हा त्याचेच फळ आहे.

..... सौ ज्योती तोडमल ( सरपंच, जेऊर )

---------------------------------------

आजच प्रवेश निश्चित करा....

आपल्या चिमुकल्यांच्या उज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा..... 

*शाळेची वैशिष्ट्ये* 

* विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न घडविण्यासाठी वर्षभर नवनवीन उपक्रम 

* संस्कृती, एकोपा जोपासण्याचे कार्य 

* उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक 

* प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष 

*  विविध खेळ, सुसज्ज क्लासरुम, प्रशस्त मैदान

* विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत पालकांशी सातत्याने संवाद

* हसत... खेळत... शिक्षण 

* मर्यादित प्रवेश 

=======================

संपर्क: 

प्राचार्या. सौ. मनीषा पवार 

मो. 7020897049 / 8999172233

व्यवस्थापिका- सौ. नलिनी खंडागळे

9527553108

=====================

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post