*वाळकीत पार पडल्या तालुकास्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या नगर तालुका विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा वाळकी येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये चिचोंडी पाटील, देऊळगाव सिद्धी, भातोडी, मांडवे या शाळांनी बाजी मारत जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे.
पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत व वाळकी बिटच्या विस्तार अधिकारी श्रीमती मंदा जगताप -माने यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली व वाळकी हायस्कुलचे प्राचार्य काकासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा व कार्यक्रमांत उत्कृष्ट प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जालिंदर खाकाळ व आभार प्रदर्शन श्रीमती मोनाली चौधरी यांनी केले. परीक्षक म्हणून विविध माध्यमिक शिक्षकांनी गुणदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी न्यू इंग्लिश स्कूलचे तुकाराम उकिरडे व इतर माध्यमिक शिक्षक, वाळकी बिटमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी परीश्रम घेतले.प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
*जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे*
हस्ताक्षर स्पर्धा- किलबिल गट -पंचमुख अनुष्का राहुल (बाबुर्डी घुमट), बालगट -हजारे प्रांजल सुभाष (चिचोंडी पाटील), किशोरगट - लांडगे शुभा संदिप (घोसपुरी), कुमारगट - सांगळे प्रांजली पोपट (बाबुर्डी घुमट), वक्तृत्व स्पर्धा - किलबिल गट - कोतकर आरोही बाळासाहेब (राळेगण), बालगट - खांदवे अनन्या संदिप (चिंचोंडी पाटील), किशोरगट - गवळी स्वराली सचिन (निंबोडी), कुमारगट - म्हस्के धनश्री संपत (दहिगाव),
गोष्ट सादरीकरण - बालगट गट - लांडगे श्रावणी रामकिसन (पिंपळगाव लांडगा), किशोर गट - बोठे अनुष्का गोविंद (देऊळगाव सिद्धी), कुमार गट - ससे वैष्णवी ज्ञानदेव (ससेवाडी), वेशभुषेनुसार सादरीकरण - किलबिल गट - शेवलेकर मयुरी किशोर (शिवाजीनगर केडगाव), बालगट - कदम मानसी मुकुंद (भातोडी), किशोर गट - इंगळे सायली सचिन (देऊळगाव सिद्धी), कुमारगट - खांदवे तनुजा सचिन (सांडवे),
वैयक्तिक गीतगायन - किलबिल गट पुंड अथर्व गहिनीनाथ (अरणगाव), बालगट - हजारे जान्हवी किशोर (अकोळनेर), किशोरगट - बारवेकर आयुष अतुल (रांजणी), कुमारगट - काळे अक्षरा अशोक (ससेवाडी),
समुहगीत गायन - लहान गट - जि. प. प्रा. केंद्रशाळा चिचोंडी पाटील, मोठा गट - जि. प. प्रा. शाळा देऊळगाव सिद्धी, सांस्कृतिक कार्यक्रम - लहान गट - जि. प. प्रा. शाळा भातोडी, मोठा गट - जि. प. प्रा. शाळा मांडवे.
Post a Comment