माय नगर वेब टीम
वरिष्ठ पुरुष (ग्रीको रोमन) व वरिष्ठ महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्हा निवड चाचणी शनिवार दिनांक, 21 डिसेंबर 2024 रोजी "संभाजी राजे कुस्ती केंद्र", पाइपलाइन रोड, सावेडी, अहिल्यानगर येथे पार पडली.
या प्रसंगी अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी आ. संग्राम अरुणकाका जगताप, सचिव प्रा. डॉ. पै. संतोष भुजबळ, अहिल्यानगर महानगरपालिकेचे सभागृह नेते संपत दादा बारस्कर, नगरसेवक सागर बोरुडे, स्पर्धेचे आयोजक पै. शिवाजी चव्हाण, जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश मदने, माधव सावंत साहेब, हनुमंत फंड, पै. संदीप गायकवाड, पै. पोपट शिंदे, पै. कानिफनाथ मुखेकर, अजय आजबे, एकनाथ उचाळे, साहेबराव पवार, मच्छिंद्र उचाळे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली.
स्पर्धेत एकूण 48 कुस्तीगीरांनी सहभाग नोंदविला. सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त कुस्तीगीर पुढीलप्रमाणे आहेत जे वर्धा येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत अहिल्या नगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील:
वरिष्ठ महिला संघ
50 किलो: पै. धनश्री संपत नवथर, नेवासा
53 किलो: पै. दिव्या भाऊसाहेब धावडे, नगर
55 किलो: पै. श्रुती सुखदेव कोकणे, संगमनेर
57 किलो: पै. चैताली संजय घुले, संगमनेर
59 किलो: पै. धनश्री हनुमंत फंड, श्रीगोंदा
62 किलो: पै. प्राची संदिप सुद्रिक, कर्जत
65 किलो: पै. गौरी कानिफनाथ मुखेकर, पाथर्डी
68 किलो:
72 किलो: पै. पल्लवी रामभाऊ खेडकर, पाथर्डी
65 ते 76 महिला महाराष्ट्र केसरी गट : पै. दिव्या गुरुलिंग शिलवंत, कर्जत
वरिष्ठ पुरुष (ग्रीको रोमन) संघ
55 किलो: पै. ओंकार रोडगे, नेवासा
60 किलो: पै. तेजस गंगाधर वारुळे, नगर
63 किलो: पै. अभिजीत भाऊसाहेब वाघुले, नेवासा
67 किलो: पै. कुमार किशोर देशमाने, पारनेर
72 किलो: पै. दिपक साहेबराव पवार, पारनेर
77 किलो: पै. निलेश मच्छिंद्र उचाळे, पारनेर
82 किलो: पै. पवन रमेश रोहोकले, पारनेर
87 किलो: पै. शामराव सखाराम गव्हाणे, नगर
97 किलो: पै. मयूर मिलिंद जपे, नगर
87 ते 130 किलो महाराष्ट्र केसरी गट: पै. अनिल शिवाजी ब्राह्मणे, राहुरी
सदर स्पर्धा अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव, आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक तसेच तांत्रिक समिती प्रमुख डॉ. पै. संतोष भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पडल्या, तांत्रिक अधिकारी व पंच म्हणून अंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. पै. संभाजी निकाळजे, अंतर्राष्ट्रीय कुस्ती पंच पै. विवेक नायकल, पै. ईश्वर तोरडमल तर संयोजक म्हणून श्री. निलेश मदने यांनी जबाबदारी पार पाडली.
Post a Comment