Ajit Pawar : सिक्सर! अजित पवारांनी सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

 


माय नगर वेब टीम 

Ajit Pawar | Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते ‘देवेंद्र फडणवीस’ यांनी आज (दि. 5) मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.


अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री : 


– 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक 71 जागा मिळाल्या. त्यावेळी अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक होते, मात्र शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडं मुख्यमंत्री पद न घेता ते पद काँग्रेसला दिलं.


– 2019 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी एकत्रित येत महाविकास आघाडी स्थापन केली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद मिळालं. यावेळी मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी अजित पवार अतिशय आग्रही होते.


– 2023 मध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादीतून फुटून भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांनी मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी एवढा मोठा निर्णय घेतल्याची चर्चा होती. मात्र त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं.


– 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाल्यानं भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत. त्यामुळे अजित पवार यांना पुन्हा उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागत आहे.


मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा सुरु असून, या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातली अनेक मान्यवर, धर्मगुरू, संत-महंत यांनी विशेष हजेरी लावली आहे.


देशभरातील अनेक दिग्गज नेते आणि कलाकार या सोहळ्याला उपस्थित आहेत. आज अखेर मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते ‘देवेंद्र फडणवीस’ यांनी महाराष्ट्र राज्याचे 21 वे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यासोबतच शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीदेखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post