माय नगर वेब टीम
Santosh Deshmukh Case – धनंजय देशमुख यांनी स्वतःहून सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की सीआयडी आधीक्षकांनी विश्वास दिला आहे की, पुढील एक दोन दिवसांत आरोपींना अटक होईल. तसेच वाल्मीक कराड यांचे निकटवर्तीय ज्योती जाधव यांची देखील सीआयडीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे.
देशमुख म्हणाले, मी पहिल्या दिवसापासून म्हणत आहे की माझ्या भावाचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील त्या सगळ्यांना अटक व्हावी, ही माझी मागणी आहे. तसेच यावेळी जी काही चर्चा झाली त्यावर सविस्तर उद्या बोलणार आहे. आता बोललो तर अर्धवट माहिती देण्यात येईल, असेही त्यांनी पत्रकारांना म्हटले.
दरम्यान, सीआयडीच्या पथकांनी कराड यांच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरु केली आहे. सीआयडीने कराडच्या पत्नीची रविवारी दुसऱ्यांदा चौकशी केली. त्यामुळे कराडवरील मानसिक दबावही वाढला असून बँक खाती गोठावल्यामुळे आर्थिक कोंडी केली आहे.
तसेच वाल्मीक कराडकडे पासपोर्ट नसल्यामुळे तो देशाबाहेर पळून जाण्याची शक्यताही कमी आहे. आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवल्यामुळे वाल्मीक कराड समोर सरेंडरशिवाय आता कोणताही पर्याय उरला नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वाल्मीक कराड लवकरच आत्मसमर्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे.
Post a Comment