माय नगर वेब टीम -
U19 Asia Cup 2024 (Final) | पुरुष अंडर-19 आशिया कप 2024 युएई मध्ये खेळवला जात आहे. ही स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना पाकिस्तान आणि बांगलादेश संघांमध्ये दुबईत झाला. या सामन्यात पाकिस्तान संघाला एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले, त्यामुळे ते स्पर्धेतून बाहेर पडले आहे. त्याचबरोबर बांगलादेश संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.
आता त्याचा सामना टीम इंडियाशी होणार आहे कारण टीम इंडियाने दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता दुबईत रविवारी विजेतेपदासाठी टीम इंडिया आणि बांगलादेश आमने-सामने येतील. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. बांगलादेशच्या या विजयाने भारत-पाकिस्तान सामन्याचे स्वप्नही भंगले. वास्तविक, पाकिस्तानने हा सामना जिंकला असता तर अंतिम फेरीत त्यांचा भारताशी सामना झाला असता, परंतु आता भारत आणि बांगलादेश संघांमध्ये विजेतेपदाची लढत होणार आहे.
बांगलादेशने स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत चमकदार कामगिरी केली. दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यांनी पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने 116 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने 22.1 षटकांत लक्ष्य गाठले आणि अंतिम फेरीत धडक मारली.
Semi Final 2 : टीम इंडिया विजयी
दुसरीकडे टीम इंडियानंसुध्दा स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत चमकदार कामगिरी केली. उपांत्य फेरीच्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो त्याच्यावरच भारी पडला. श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करताना भारताने 173 धावांत रोखले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाने अवघ्या 21.4 षटकात 3 गडी गमावताना 175 धावा करत सहज विजय साकारला आणि दिमाखात अंतिम फेरीत स्थान मिळवले.
स्पर्धेत 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीची दमदार कामगिरी…
वैभवने भारतासाठी चमकदार कामगिरी केली आहे. त्याने अंडर 19 आशिया कप 2024 च्या 4 सामन्यात 167 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 12 चौकार आणि 12 षटकार मारले. वैभवने दोन अर्धशतकेही झळकावली आहेत. वैभवने यापूर्वी यूएईविरुद्ध स्फोटक फलंदाजी केली होती. त्याने यूएईविरुद्ध नाबाद 76 धावा केल्या होत्या.
Post a Comment