माय नगर वेब टीम -
मुंबई – मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तो विस्तार ११ किंवा १२ डिसेंबरला होण्याची शक्यता सत्तारूढ महायुतीमधील सुत्रांकडून वर्तवण्यात आली.
राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त ४३ सदस्यांचा समावेश होऊ शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार या उपमुख्यमंत्र्यांमुळे मंत्रिमंडळातील ३ सदस्य निश्चित झाले आहेत. आता उर्वरित ४० मंत्र्यांची निवड करताना महायुतीचा कस लागणार आहे.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होईल. त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार निश्चित मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवलेल्या महायुतीमधील सर्वच घटक पक्षांचे संख्याबळ लक्षणीयरित्या वाढले आहे. त्यामुळे त्या पक्षांना मंत्र्यांची निवड करताना तारेवरची कसरत करावी लागेल.
मंत्रिपदांसाठी इच्छूक असणाऱ्यांकडून जोरदार लॉबिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महायुतीच्या गोटात बैठका, भेटीगाठींचे सत्र वाढेल. कुठल्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदे याविषयीचा फॉर्म्युला पुढील २ दिवसांत निश्चित होण्याची चिन्हे आहेत.
Post a Comment