माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे घेऊन जाणारा टेम्पो कोतवाली पोलिसांनी पकडला. सहा जनावरे व टेम्पो असा सहा लाख 65 हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. गुरूवारी (19 डिसेंबर) पहाटे कल्याण रस्ता ते हॉटेल रंगोलीकडे जाणार्या रस्त्यावर ही कारवाई केली.
या प्रकरणी दोघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माल वाहतूक टेम्पोमध्ये बांधलेल्या स्थितीत गोवंशीय जातीचे जनावरे कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने कल्याण रस्ता ते हॉटेल रंगोलीकडे जाणार्या रस्त्यावर सापळा लावून संशयित टेम्पो (एमएच 16 एवाय 6280) पकडला. त्यातील शहजहाँ अब्दुलकलीम कुरेशी (वय 30, रा. बाबा बंगाली, शाळा नं. 4 जवळ, झेंडीगेट), समीर बाकर चौधरी (वय 32, रा. फर्स इंप्रेशन दुकानाचे मागे, नालबंद खुंट, अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले. सदर टेम्पोची पाहणी केले असता त्यामध्ये सहा गोवंशीय जनावरे मिळून आली. जनावरे व टेम्पो असा सहा लाख 65 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार योगेश भिंगारदिवे, ए. पी. इनामदार, संभाजी कोतकर, संदीप पितळे, दीपक मिसाळ, राजेंद्र पालवे, सचिन लोळगे यांच्या पथकाने केली आहे.
Post a Comment